मनोरंजन

‘झुमे जो पठाण’ दुसरं गाणं रिलीज, शाहरूख- दीपिकाचा बोल्ड अंदाज

अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण या आगामी चित्रपटाचा वाद अद्याप संपलेला नाही. तोवर चित्रपटातील दुसरे गाणे झूमे जो पठान रिलीज झालं आहे. या चित्रपाटील ‘बेशरम रंग’ हे गाणं दीपिकाच्या वेशभूषेमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

झूमे जो पठान है दुसरं गाणं आज (दि. १८) रिलीज झालं. या गाण्यातही दीपिका आणि शाहरुख बोल्ड अंदाजात दिसत आहेत. याआधी ‘ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅप्पी न्यू इअर’ असे लोकप्रिय चित्रपट दिल्याने दीपिका- शाहरुख ही जोड़ी पडद्यावर हिट ठरली आहे. त्यामुळे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान चर्चेत येत आहे.
‘झुमै जो पठान’ है पठाण चित्रपटातील नव गाणं एक पार्टी सॉंग (party song) आहे. या गाण्यात शाहरुख आणि दीपिकाची धमाकेदार कैमिस्ट्री चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या गाण्याला अरिजित सिंग, सुकृति कक्कर आणि विशाल शेखर यांनी आवाज दिला आहे तर संगीतकार विशाल-शेखर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ‘बेशर्म रंग’ या गाण्याची कोरिओग्राफर वैभवी मर्चंट होती. या गाण्याला बॉस्को आणि सीझरच्या जोडीने कोरिओग्राफ केले आहे. हे गाणं कानावर पडताच चाहत्यांचे पाय थरकू लागतील एवढं मात्र नक्की!

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button