जिल्हा ज्युनियर टेनिसबॉल क्रीकेट संघ निवड चाचणीचे आयोजन
टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन ऑफ नांदेडच्या वतीने दि . २० ऑगस्ट २०२३ वार रविवार रोजी सकाळी ९ : ०० ते दुपारी १२:०० वा . या वेळेत व्यंकटराव तरोडेकर हायस्कूल कल्याण नगर नांदेड मैदान येथे जिल्हा टेनिसबॉल क्रीकेट संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे . सदरील निवड चाचणीत १ ९ वर्षा खालील ( जन्म दि .०१.० ९ .२००४ नंतरचे ) मुले व मुली सहभाग नोंदवू शकतात.
या निवड चाचणीत निवड झालेले खेळाडू टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व नंदूरबार जिल्हा टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि .०१ ते ०३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नंदुरबार जि.नंदुरबार येथे आयोजित होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रीकेट चॅम्पीयनशीप या स्पर्धेत नांदेड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करतील . या निवड चाचणीत सहभाग नोंदवितांना खेळाडूंनी ३ पासपोर्ट साईज फोटो , आधार कार्ड , जन्म दाखल्याचा पुरावा किंवा शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र व प्रवेश शुल्क १०० / – सोबत आणावे . निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन ऑफ नांदेडच्या वतीने यांनी केले आहे .