राज्यस्तरीय पहिली टी -10 क्रिकेट चषक नांदेड तिसऱ्या स्थानावर
नांदेड दि 10, महाराष्ट्र स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ-द-डेफ या फाउंडेशनच्या वतीने राज्यातील मुक -बधिर यांची पहिली टी -10 बधिर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पुणे येथे ४ व ५ मे रोजी पार पडली. या पहिल्या राज्यस्तरीय चषकावर नांदेडच्या क्रिकेट संघाने नाव कोरले असून त्यांनी तिसरे बक्षीस पटकावले आहे.
राज्यातील मूक -बधिर खेळाडूंसाठी महाराष्ट्र डेफ प्रीमियर लीग टेनिस बॉलच्या पहिल्या टी-10 (टी -टेन) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे येथील एसपी कॉलेज येथे ४ व ५ मे रोजी आयोजित करण्यात आले होते. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील २४ मूक बधिर क्रिकेट संघांनी भाग घेतला होता.
नांदेड येथील प्रशिक्षक व सह व्यवस्थापक रमाकांत गजभोर याच्या मार्गदर्शना खाली क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता. श्रीधर राजारेड्डी आलुरवाड (कर्णधार) याच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तिसरे बक्षीस पटकावत चषक जिकला व जिल्ह्याचे नाव राज्यात केले. यात चंद्रकांत धुमाळ (उपकर्णधार), श्री. जयवंत देविदास हटकर, पांडुरंग नरेवाड, विष्णू मुंजाजी वळसे, आकाश खिल्लारे, सय्यद हारून, गजेंद्र दासरवार, गणेशसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर नकाते, संदिप रामराव दामलवार, साईनाथ सुर्यवंशी, शंकर पिलगुंडे, प्रशिक्षक सह व्यवस्थापक- रमाकांत गजभोर होते. पुणे प्रथम, ठाणे द्वितीय , नागपूर चौथ्या क्रमांकावर राहिले. विजयी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.