आकाश गौडचा सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णवेध
नांदेड दि.31 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वेटलिफ्टिंगपटू उत्कृष्ट खेळाडू आकाश गौड याने चंदीगड पंजाब राज्यात सुरू असलेल्या आखील भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २४0 किलो वजन उचलून सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावले. त्याच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन पाहून त्यास सर्वोत्कृष्ट भारोत्तोलक (best Lifter) म्हणून गौरविण्यात आले. त्यास हे सुवर्ण यश मिळवण्यासाठी प्रशिक्षक डॉ.उस्मान गनी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर साहाय्यक प्रशिक्षक संघव्यवस्थापक म्हणून डॉ अशोक वाघमारे यांचे मार्गदर्शन ही लाभले आकाश गौड यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे कुलगुरु डॉ.प्रकाश ए. महानवर,
प्र. कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, क्रिडा संचालक डॉ.मनोज रेड्डी, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. दिपक बच्चेवार, डॉ.प्रदीप देशमुख,प्राचार्य डॉ.एस.पी. गायकवाड,अधिसभा सदस्य डॉ.महेश बेबंडे, माजी क्रिडा संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार,अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ.कैलास पाळणे, अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. विक्रम कुंटूरवार,डॉ.महेश वाखरडकर,डॉ.गोमचाळे सर, यांनी अभिनंदन करून पुढील विश्व विद्यापीठ स्पर्धेसाठी आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.