फारुक पाशा “आमदार चषक” रविवारी अंतिम सामना व बक्षीस वितरण
नांदेडः नांदेडचे पहिले हॅट्रीक आमदार व माजी मंत्री दिवंगत सय्यद फारुक पाशा यांच्या स्मृतीत सुरु असलेल्या “आमदार चषक” लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे आज दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता अंतिम सामना खेळला जाणार असुन दुपारी 4 वाजता सदरील टुर्नामेंटचे बक्षिस वितरण व समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अंतिम सामन्यात विजयी व पराभुत दोन्ही संघांना अनुक्रमे विनर व रनर बक्षिस हे माजी आमदार दिवंगत फारुक पाशा व माजी आमदार दिवंगत प्रा. नुरुल्ला खान या दोन्ही परिवारांच्या हस्ते देण्यात येणार असुन प्रमुख उपस्थितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना निमंत्रीत करण्यात आले असुन यांच्या सोबत सन्माननीय माजी राज्यमंत्री व नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ माधवराव किन्हाळकर, नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, माजी मंत्री सय्यद फारुक पाशा यांचे चिरंजीव फैसल पाशा, माजी आमदार प्रा. नुरुल्ला खान यांच्या पत्नी गौसियाबेगम नुरुल्ला खान, अफसरउल्ला शहेबाज खान, जिल्हा पत्रकार संगठनेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, नांदेड वार्ताचे मुख्य संपादक प्रदीप नागापुरकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, अल-हयात हॉस्पिटलचे संचालक डॉ अवैस अब्बासी, मोईज फारुक पाशा, नांदेड क्रिकेट असोसिएशनचे सचिव नंदु कुळकर्णी, माजी महापौर अजय बिसेन, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महानगराध्यक्ष अयुब खान, दक्षीण महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, दक्षीण तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, उत्तर तालुकाध्यक्ष मुकुंद नरवाडे सहीत पक्षाचे विभागीय, जिल्हा, महानगर स्तराचे पदाधिकारी व फारुक अहमद मित्र परिवार उपस्थित राहणार आहे.
सदरील टुर्नामेंट मध्ये सेमीफायनल मध्ये जौहर क्रिकेट क्लब, मौलाना आझाद क्रिकेट क्लब व नांदेड वेटरन्स क्रिकेट क्लब, आबादी बॉईज़ मध्ये खेळला गेला ज्यात सकाळच्या मॅच मध्ये जौहर क्रिकेट टिमच्या शमशुजमा व यश यादव या दोन्ही खेडाळुंनी शतक ठोकुन टिमचा स्कोर 244 रन काढुन मौलाना आजाद संघाला 148 रनने पराभुत केले तर दुस-या सामन्यात नांदेड वेटरन्स व आबादी बॉईज मधील चुरशीच्या सामन्यात आबादी बॉईज ने जिंकला व अंतिम सामन्यात प्रवेश केला।
आज रविवार 11 फेब्रुवारी रोजी जैहर क्रिकेट टीम व आबादी बॉईज मध्ये फायनल मॅच खेळला जाईल तसेच अंतिम सामन्या नंतर लगेच बक्षिस वितरणाचे कार्यक्रम होणार आहे. असे टुर्नामेंटचे आयोजन फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले असुन व्यवस्थापन समीती मध्ये क्रिकेट खेळातील तज्ञ व इंडियन मुस्लिम जिमखानाचे ज्येष्ठ खेळाडु महंमद फहीम, अथर मोमीन, मोईन अ. रहीम, जावेद हाश्मी व महंमद कासीम यांनी पत्रका द्वारे कळवले असुन नांदेडकरांनी श्री गुरुगोविंद सिंग स्टेडीयम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.