अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वे मध्ये प्रवाश्यांच्या सामानाची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यासाठी विशेष टीमची नियुक्ती
श्री अमित कुमार मिश्रा, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, नांदेड यांच्या देखरेखीखाली अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वे मध्ये प्रवाश्यांच्या सामानाची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यासाठी विशेष टीमची नियुक्ती करण्यात आली आहे.
जानेवारी -2024 पासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत कार्यवाही करून जानेवारी ते एप्रिल -2024 पर्यंत एकूण 490 प्रकरणे रेल्वे अॅक्ट 144 अंतर्गत नोंदवण्यात आली आहेत.
गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल-2024 मध्ये 171 प्रकरणे रेल्वे अॅक्ट 144 नोंदवण्यात आली आहेत. या मोहिमेदरम्यान, विशेष पथकाने जानेवारी-2024 ते एप्रिल-2024 पर्यंत 490 अनधिकृत फेरीवाले आणि 21 प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली आहे. ही मोहीम या पुढेही सुरूच राहणार आहे.