मुदखेड येथे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी
मुदखेड प्रतिनिधी (मोहम्मद हकीम) पत्रकारावरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेली शासन स्तरावरील कुचराई या बाबीच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकाराच्या 11 प्रमुख संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याची राजव्यापी होळी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम .देशमुख यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 17 ऑगस्ट रोजी शहरांमध्ये काळे रुमाल घालून तालुका पत्रकार संघाच्या वतीने सदर बाबीचा व पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पत्रकार संरक्षण कायद्याची उमरी चौकात होळी करण्यात आली.
प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागे ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस सर्व पत्रकारांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .उमरी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेल्या फलकास देखील पुष्पहार अर्पण करून पत्रकारावर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारावर हल्ले करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही झालीच पाहिजे, या घोषणांनी पत्रकारांनी उमरी चौरस्ता व तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. व काही काळ तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारा जवळ धरणे धरण्यात आली .आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे ,पत्रकारावरील हल्ल्याचे खटले जलद गती न्यायालयामार्फत चालविणे, व पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे तालुका पत्रकार संघाच्या वतीने सविस्तर लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मुगाजि काकडे यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी तालुका पत्रकार संघाच्या निवेदनातील भावना आपण शासनास कळवू अशी प्रतिक्रिया या निमित्ताने बोलताना तहसीलदार मुगाजि काकडे यांनी दिली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे माजि जिल्हा सह सचिव संजय कोलते यांनी पत्रकारांच्या मागण्याविषयी लेखी निवेदनाचे सविस्तर वाचन करत प्रशासकीय यंत्रणेचे या प्रकरणी लक्ष वेधले .
यावेळी ज्येष्ठ पत्रकार गंगाधर डांगे , अजगर हुसेन ,तालुका अध्यक्ष शेख जब्बार, संतोष पाटील गाढे, सिद्धार्थ चौदं ते, शेख इमाम साब ,संतोष दर्शन वाढ ,साहेबराव हाऊस रे, अतिक अहेमद , शेख शमशुद्दीन ,शेख इरफान, अब्दुल रजाक ,साहेबराव गागलवाड, दिनेश शर्मा, अमोल टेकले , आवेश कुरेशी, हाफिज कुरेशी, मोहम्मद हकीम मोहम्मद गौस , यांच्यासह शहर व तालुक्यातील अन्य पत्रकारांची उपस्थिती होती .
दरम्यान पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे .कॉ. किशोर पाटील, अरविंद सिंनगार पुतळे, पांचाळ, या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.