जुन्या नांदेडातील रस्त्याचे काम पूर्ण करा किंवा अर्धवट काम करणाऱ्या गुत्तेदारावर कायदेशीर कारवाही करा
नांदेड दि. 18 जुना नांदेड भागातील मुख्य रस्ता अनेक दिवसापासून अर्धवट कामाच्या स्थितीत असल्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आरामशीन ते चौफाळा रंगारगल्ली सराफा, जुना गंज, करबला रोड, भोपळे हॉस्पीटल पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली. रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्या रस्त्यावरुन ये-जा करणान्या नागरिकांना खुप त्रास होत आहे. येणाऱ्या काळात गणेश उत्सव व नवरात्र उत्सव, आगमण मिरवणुक व विर्सजन मिरवणुकीचा मुख्य रस्ता आहे.
तरी हा रस्ता तात्काळ करण्यात यावा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बिलालनगर आरामशीन रस्त्याचे वर्क ऑर्डर व निधी मंजुर झाल्याच्या नंतरही काम अर्धवट सोडून दिले आहे. संबधित गुत्तेदार यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा हा. रस्ता बांधून पूर्ण न झाल्यास महापालिके समोर उपोषण करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असा इशारा गजानन पाटील हारकरे यांनी दिला आहे सदरिल निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नांदेड यांनाही देण्यात आली आहे.