स्पोर्ट्स
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांचे यश
मास्टर्स गेम्स फेडरेशन, उत्तर प्रदेश यांच्याद्वारे नाशिक येथे आयोजीत 5 व्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील अंमलदार जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर व रामेश्वर राजकुमार जाधव यांनी एकुण 6 पदकाची कमाई केली.
मास्टर्स गेम्स फेडरेशन, उत्तर प्रदेश यांनी नाशिक येथे दिनांक 18 व 19 मार्च रोजी 5 व्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेचे आयोजन विर सावरकर जलतरणीका, नाशिक येथे केले होते. या स्पर्धेत 10 राज्यातील 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्र राज्यातील संघात सहभागी असलेल्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील अंमलदार जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर यांनी 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात गोल्ड मेडल, 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात गोल्ड मेडल व 200 मीटर वैयक्तीक मीडले रीले प्रकारात गोल्ड मेडल असे एकुण तिन सुवर्ण पदकांची कमाई केली तर पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव यांनी 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात गोल्ड मेडल, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात गोल्ड मेडल व 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावत एकुण तिन मेडल्सची कमाई केली.
या यशाबद्दल मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस उप अधीक्षक (गृह) नांदेड, पोलीस अधीक्षक यांचे स्विय सहायक श्री व्यंकट वडजे, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे वाचक श्री अशोक देशमुख यांनी सदर अंमलदारांचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.