चौफाळा सिद्धनाथ पुरी परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
नांदेड दि.२८ चौफाळा, सिद्धनाथपुरी परिसरातील मातामंदिर समोर नाल्यांचे पाणी मागील सहा महिन्यापासून रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रार आणि सूचना करूनही हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे या परिसरातील स्वच्छता निरीक्षक महेंद्र कांबळे यांना देखील अनेक वेळा सूचना देऊन देखील साफसफाईच्या कामाकडे ते मुद्दामहून दुर्लक्ष करत आहेत चौफळा भागात असलेल्या मुख्य जल कुंभातून मागील अनेक दिवसापासून तांत्रिक बिघाडामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे देखील सर्व रस्ते पाणीमय झाल्याचे दिसून येत आहे याकडेही प्रशासन डोळेझाक करत आहे सध्या या भागात बहुल असलेल्या मुस्लिम समाजाचा रमजान हा पवित्र महिना चालू असून परिसरातील नागरिकांना प्रार्थना करताना त्रास होत आहे तसेच सर्वत्र दुर्गंधी देखील पसरली आहे तरी प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन परिसर स्वच्छतेचे व नाली स्वच्छतेचे काम त्वरित करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आणि चौफाळा पाणी टाकीचा वॉल लिकचं हुन हजारो लिटर पाणी रस्त्यावर वय जात आहे गेल्या एक वर्षा पासून चालू आहे. अन्यथा नागरिकांच्या संयमाचा बांध सुटून ते प्रशासनाला धारेवर धरतील.