स्पोर्ट्स

ज्ञानेश चेरले राज्य शालेय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र तर अथर्व भुसेवार व संयम कांबळे कांस्यपदकाचे मानकरी…

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने 17 ते 19 फेब्रुवारी 2023 दरम्यान तुळजाभवानी स्टेडियम उस्मानाबाद येथे आयोजित राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेत नांदेडच्या ज्ञानेश बालाजी चेरले यांनी एक सुवर्ण तीन कांस्यपदक मिळवित राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी पात्रता कायम केली असून नांदेडच्या अथर्व श्रीनिवास भुसेवार व स्वयंम मालू कांबळे यांने कांस्यपदकाची कमाई केली आहे .राज्यशालेय धनुर्विधा स्पर्धेत नांदेड मधून लातूर विभागाचे नेतृत्व करीत ज्ञानेश बालाजी चेरले सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल किनवटचा विद्यार्थी असून 14 वर्षांखालील रिकवर प्रकारात खेळताना 50 मीटर अंतरावर सुवर्णपदक 40 व 30 मीटर मध्ये कांस्यपदक व टीमचे कास्यपदक मिळवत राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे . त्याला त्याचे वडील तथा प्रशिक्षक बालाजी चेरले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

 

तर नांदेडच्या ज्ञान माता विद्याविहार शाळेचा अथर्व श्रीनिवास भुसेवार यांने व महात्मा फुले हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या स्वयम मालू कांबळे यांनी 14 वर्षे वर्षाखालील वयोगटात रिकवर प्रकारात खेळताना टीमचे कांस्यपदक मिळवण्यात यश प्राप्त केले त्यांना आर्चरी स्कूल नांदेडच्या संचालिका तथा जिल्हा संघटना सचिव प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले .विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी उस्मानाबाद श्रीकांत हरनाळे , अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे ,तहसीलदार गणेश माळी , नायब तहसीलदार यस .डी . बोथीकर , प्रवीण गडदे क्रीडा अधिकारी कैलास लटके यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले .त्यांच्या यशाबद्दल नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर शिवकांता देशमुख प्रशिक्षका वृषाली पाटील जोगदंड शासकीय प्रशिक्षक अनिल बंदेल नांदेड तालुका संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपीले , संजय चव्हाण माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगा लाल यादव , क्रीडाशिक्षक संतोष स्वामी , क्रीडाशिक्षक विष्णू शिंदे , पुरुषोत्तम कामदगीकर ,राजेंद्र सुगावकर शिवाजी पुजरवाड , मालोजी कांबळे , संतोष कंकावार , अभिजीत ( मुन्ना) कदम सौ पतंगे मुख्याध्यापक मनोहर सुर्यवेशी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button