अल्पसंख्यांक महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
नांदेड दि.१९ देगलूर नाका येथील मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत गायले गेले.यावेळी प्रा.अक्षय हासेवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मनिरपेक्ष राज्यकारभारा विषयी थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुकतरे,प्रा.डॉ. स्मिता कोंडेवार,प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा.मारुती भोसले, प्रा.शेख नजीर,प्रा.मोहम्मद दानिश,प्रा.मोहम्मद अतिफोद्दीन,प्रा.निजाम,प्रा. नुरी बेगम,प्रा.सनोबर आफरीन,श्री.शेख रब्बानी, मोहम्मद मोहसीन,प्रभावती नवसागरे,गौस खान पठाण,मोहम्मदी बेगम यांची प्रमुख उपस्थिती होती.