जिला

नांदेड ते बासर महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्पाचे शिल्पकार अशोकराव चव्हाण यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आज आयोजन

नांदेड,दि.19 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार होणारा नांदेड ते बासर तेलंगना सिमेंपर्यंत जाणारा महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली असून 98.8 कि.मी. लांबीचा सीसी रस्ता असून 1329 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाह्यातून हा प्रकल्प होणार असून या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यामुळे रस्ता विकास कामांचे शिल्पकार अशोकराव चव्हाण यांचे आभार मानण्यासाठी धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे 20 फेब्रुरोजी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमातच मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून नुकतेच निवडूण आलेले शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. धर्माबाद तालूक्यातील कारेगाव फाटा या ठिकाणी दुपारी 1 वाजता. होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खा. भास्करराव पाटील खतगांवकर हे असणार आहेत.

तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. ईश्‍वरराव भोसीकर माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, बबन बारसे, माधवराव पावडे, शेतकरी नेते व उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरुजी, उमरी पंचायतसमितीचे माजी सभापती शिरीष बापुसाहेब गोरठेकर आदि मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कृतज्ञता सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नांदेड जिल्हा महाविकास आघाडीच्या वतिने करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button