शिक्षण
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत-डॉ लेखणे
मुजामपेठ दि.20 राष्ट्रीय सेवा योजने मध्ये कार्य करणारे स्वयंसेवक हे राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत आहेत ते राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात, असे मत प्रा.डॉ.शंकर लेखणे यांनी व्यक्त केले ते कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मुजामपेठ येथे आयोजित विशेष वार्षिक शिबिर उदबोधन वर्गात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. पुष्पा क्षीरसागर या होत्या. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भूकतरे यांनी केले. पुढे डाॅ.लेखणे म्हणाले की,भारतामध्ये विविध जाती, धर्म आणि पंथाचे लोक राहतात या सर्वांना एकत्रित राहण्यासाठी युवकांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे.
यासाठी युवकांना तयार करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत असते या उद्बोधन वर्गात कै.मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय शंकरनगरचे प्रा. डॉ.शिवाजी कांबळे यांनी व्यसनमुक्ती या विषयावर बोलताना असे म्हटले की युवकांनी मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे नाहीतर त्यांचा, त्यांच्या कुटुंबाचा पर्यायाने देशाचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही युवक जेवढे मादक पदार्थापासून दूर राहतील तेवढे ते देशाच्या विकासात मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतात अत्यंत मनोरंजक गीत,कविता व विनोदी शैलीचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सय्यद सलमान यांनी केले तर आभार प्रा.शेख नजीर यांनी मानले यावेळी प्रा.अक्षय हासेवाड,प्रा. मोहम्मद अतिफुद्दीन,प्रा. दानिश,प्रा.फर्जाना बेगम, मोहम्मद मोहसीन,आयशा बेगम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिरातील शिबिरार्थी स्वयंसेवकांची उपस्थिती होती