देश विदेश
भारतीय रेल्वे टाईम टेबल / ट्रेन्स एट अ ग्लान्स 2023 ची वैधता 31 डिसेंबर-2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे
2023 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या भारतीय रेल्वे टाईम टेबल / ट्रेन्स एट अ ग्लान्स ची वैधता 30 जून 2024 पर्यंत होती. दिनांक 01 जुलै 2024 पासून नवीन टाईम टेबल अस्तित्वात येणार होता.
रेल्वे मंत्रालयाने या वेळा पत्रकाचा कालावधी दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविला आहे. भारतीय रेल्वे मध्ये धावणाऱ्या सर्व गाड्या या भारतीय रेल्वे टाईम टेबल / ट्रेन्स एट अ ग्लान्स नुसारच दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत धावतील. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.