नांदेडच्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये अल्पसंख्यांकांसाठीच्या इ अॅण्ड टी शाखांचे प्रवेश सुरु करा; अन्याय प्रतिकार दलाचे राज्य अध्यक्ष सिद्धार्थ तलवारे यांची मागणी
नांदेड- येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अल्पसंख्यांकांसाठीच्या द्वितीय पाळीतील इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन शाखांचे प्रवेश त्वरीत सुरु करण्याची मागणी अन्याय प्रतिकार दलाचे राज्य अध्यक्ष सिद्धार्थ तलवारे यांनी एका निवेदनाद्वारे राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालय संचालक यांच्याकडे केली आहे.
तलवारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णय 2010 नुसार नांदेड येथे तीन नवीन शाखा स्थापण्याची मंजुरी देण्यात आली. त्यानुसार द्वितीय पाळीसाठी मंजूर आहेत. परंतु नांदेड तंत्रनिकेतनने केवळ मेकॅनिकल व सिव्हीलची प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखांसाठीचे अल्पसंख्यांक विद्यार्थी वंचित राहत आहेत, असा आरोप तलवारे यांनी केला आहे. तसे निवेदन त्यांनी राज्याच्या संबंधित मंत्र्यासह संचालकांना पाठविले आहे.