नांदेड-मनमाड-नांदेड एक्सप्रेस काही दिवस अंशतः रद्द
नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे पटरी च्या देखरेखी / दुरुस्ती करीता रोलिंग कोरीडोर ब्लॉक घेण्यात आला आहे, या मूळे नांदेड-मनमाड-नांदेड एक्सप्रेस काही दिवस अंशतः रद्द करण्यात आली आहे, तसेच नगरसोल – काचीगुडा एक्सप्रेस काही दिवस उशिरा धावेल, ती पुढील प्रमाणे –
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1. गाडी क्रमांक 07777 नांदेड ते मनमाड एक्सप्रेस दिनांक 26 फेब्रुवारी ते 24 मार्च, 2024 दरम्यान नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 07778 मनमाड ते नांदेड एक्सप्रेस दिनांक 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान पूर्णा ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
उशिरा धावणारी गाडी :
1. गाडी क्रमांक 17662 नगरसोल ते काचीगुडा एक्सप्रेस दिनांक 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान सेलू ते नांदेड दरम्यान 120 मिनिटे उशिरा धावेल.