हिमायतनगरात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केलं
हिमायतनगर| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. हिमायतनगर येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारून प्रतिमेचे दहन करून एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्तेचा माज आलेल्या महसुल मंत्री राधाकृष्ण विखें पाटील हे नांदेड येथे आले असता त्यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं होतं. स्वताचा मुलाचा पराभव पचला नसल्याने त्यांनी आकसा पोटी मनोज जंरागे पाटलांवर बेताल वक्तव्य करून मराठा समाज बांधवांच्या भावनांना ठेस पोचविली आहे. राधाकृष्ण विखे हे मराठा नेते आहेत, एकीकडे अन्य समाजाचे नेते वेगवेगळ्या पक्षात राहुन देखील आपल्या जातीची पाठराखण करत आहेत. आणी हे मराठा जातीत असुन, बिभीषणाची भुमीका घेत आहेत. येणाऱ्या काळात त्यांनी असे वक्तव्य करणे जर टाळले नाही आणी दिनांक १३ जुलै पर्यतं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही तर मंत्री विखेनां महाराष्ट्रात फिरणे मुस्कील होईल असा इशाराही यावेळी देंण्यात आला.
आज दिनांक २६ जून बुधवारी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या बद्दल मंत्री विखे पाटील यांनी
केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राधाकृष्ण विखे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. सुरुवातीला प्रतिमेला जोडे मारून त्यानंतर प्रतिमेचे दहन करत एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष बालाजी लक्ष्मण ढोणे, अवधुत पाटील पवार, मुन्ना भाऊ शिंदे, ऋतिक कदम, शिवकांत सूर्यवंशी, संतोष कदम, भाऊ कदम, मारोती सूर्यवंशी, आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली.