जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैदयांना निकृष्ठ दर्जाचे जेवण
अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे निवेदन
औरंगाबाद (प्रतिनिधी) : औरंगाबाद येथील हर्सुल येथे असलेले जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे जेल प्रमुख व कमचारी, अधिकारी हे रोजचे जेवण व नाष्टा हे निकृष्ठ दर्जाचा देत असून, काही कैदी आजारी पडल्यावर त्यांना वेळेवर औषधोपचार केला जात नाही. केवळ शासनाकड़े सुविधा मिळण्यासाठी बजेटची मागणी नेहमी केल्या जाते. बजेट उचलण्यात येते खर्च न करता काही बजेट हडप करण्याचे प्रकार चालू आहेत. जिल्हा कारागृह अधिक्षक, वरीष्ठ तुरंग अधिकारी, तुरंग अधिकारी हे कैदयांना येणारा धान्य कोठा, भाजीपाला, दुध, व ईतर खाण्याच्या वस्तू निकृष्ठ दर्जाच्या खरेदी करून उच्च प्रतिचे सर्व खाण्या पिण्याचे समान खरेदी केल्याचे बीले जोडुन लाखो रुपयांचा घोटाळा करत आहेत. पिण्यासाठी शुध्द पाण्याची सोय केलेली नाही. केवळ कैद्यांना धमकावून त्यांना मारहान करून गप बसण्याचे कर्तव्य बजावत आहेत. असे निवेदन आज अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेने विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले.
निवेदनात असे म्हटले आहे की आजारी कैदयानां औषध-गोळी व शासनाच्या मेनुफेस्टुनुसार सेवा सुविधा देत नसल्यामुळे व कैद्याने तक्रार केल्यास मारहान करत असल्या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी.
या वेळी मोहम्मद रिझवान, शेख अझलान शेख कलीम, हबीब हसन चाऊस उपस्थित होते. परिषदेचे अल्पसंख्यांक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष मोहम्मद रिजवान एम.आर यांनी सांगितले की कैदयाला नियमानुसार बॅरल मध्ये ठेवण्याचा नियम आसताना मनमानी पध्दतीने बंदी बनवण्याचे कर्तव्य बजावत आहेत. कारागृहात कैदी सुधारण्यासाठी न्यायालय सजा देते परंतु येथील सर्व अधिकारी / कर्मचारी हे कैद्यांना गन्हेगार कसे बनतील असे कर्तव्य बजावत आहेत मी हा सर्व प्रकार स्वतः बघीतला आहे. मी काही दिवस औंगाबाद हर्सूल येथील कारागहात गेलेलो होतो मी हा सर्व प्रकार पाहिलेला आहे या कारागृहात तक्रार करण्याची कोणत्याच कैद्याची हिमत होत नाही. त्यामुळे या कारागृहात भ्रष्टाचार दिवसेन दिवस वाढत आहे.
कारागृहात सर्व सेवा सुविधाच्या खरेदीवर भ्रष्टाचार करणे चालु आहे. काही कैदी कैटिन मधुन खरेदी करुन जेवण करतात कारण कारागृहातील जेवण निवळ निकृष्ठ दर्जाचे असून हे जनावरे सुध्दा खाणार नाही अशी आवस्था झाली आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दुधात पाणी मिक्स करून कैद्यांना देण्यात येते कारण दुध कमी घेणे व जासतेचे घेतल्याचे बील तयार करणे हा गोरक धंदा चालू आहे. मी कारागृहात होते त्यामुळे मला वरील सर्व बाबी माहित आहेत. याची उच्च स्तरीय चौकसी करावी अशी माझी मागणी आहे कि, कारागृहात सर्व जेवण चांगले मिळते काय याची चौकशी अन्न व औषध प्रशासना मार्फत कराण्यासाठी आदेश काढण्यात यावेत.
तात्काळ चौकशी न झाल्यास मी आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने बेमुदत अन्य त्याग उपोषण करण्याचा ईशारा देत आहे. मी तक्रार केली याचा राग धरून माझेवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करीतील याची नोंद घेवून तात्काळ उच्च स्तरीय चौकशी करण्याची माझी तक्रार आहेआहे असे मोहम्मद रिझवान यांनी सांगितले.