जिला

धर्माबादेत भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी, भव्य मिरवणुकीने धर्माबाद दणाणले

धर्माबाद (अनंतोजी कालिदास ) धर्माबाद तालुक्यातील विश्वकर्मा समाज बांधवांच्या वतीने धर्माबाद शहरांमध्ये विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य तयारी कराची व पालखीची मिरवणूक धर्माबाद च्या मुख्य रस्त्याने करण्यात आली यावेळी धर्माबाद पानसरे चौकामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व भगवान विश्वकर्मा यांच्यातील चित्राला पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी दैनिक विष्णुपुरीचे संपादक मनोज बुंदेले, साप्ताहिक आपलं नांदेडचे संपादक तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते शिवराज पाटील गाडीवान यांनीही भगवान विश्वकर्माच्या पालखीचे पूजन करून दर्शन घेतले.
 माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते.  सृष्टीच्या प्रारंभी केवळ भगवान विश्वकर्मा अस्तित्वात होते. समस्त प्राणीसृष्टीचा विश्वकर्मा जनक मानले गेले आहेत. एक वैदिक देवता असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचे महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. ते हरहुन्नरी होते.
शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली. हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात. कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. जाणून घेऊया. विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक, सुतलनामक पाताळलोक, श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरूड भवन आदींची निर्मिती केली. विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, विश्वकर्मा पुत्र नल व नील यांनी रामसेतू बांधला. विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक आदींची रचना केली. याशिवाय जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती, लंका, श्रीकृष्णांची द्वारका अशा अनेकविध दिव्य वास्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती, असे सांगितले जाते. यावेळी सत्यनारायण पांचाळ, शंकर दोगनाल, महेश पांचाळ, अविनाश पांचाळ राजेश्वर धानोरकर,ओमसाई पांचाळ, द्वारकानाथ पांचाळ, राजेश वंगल, साईनाथ जुन्नीकर, तुकाराम पांचाळ,मोहन पांचाळ, नागेश मंगनाळीकर, जगदिश जांगीड, नंदकिशोर जांगीड भगवान पांचाळ, नारायण पांचाळ ,जुन्नीकर,व धर्माबाद तालुक्यातील विश्वकर्मा समाजाच्या अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांची व मान्यवरांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button