मराठवाडा

शेती, राजकरण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम म्हणजे कांतायण -विजय अण्णा बोराडे यांचे प्रतिपादन

 

 

परभणी (१०) कांतराव काका यांचा कार्यपट पाहिल्यास असे लक्षात येते की शास्वत विकासासाठी समाज आणि येथील पुढार्‍यांनी काकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. ते शासकीय काम करताना ही योजना शासकीय न समजता स्वतःच्या घरची आहे असे समजून काम करतात.त्यांनी केलेले कार्य हे सक्षम आहे त्यामुळे ते शेती, राजकारण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम आहेत असे मत कृषिरत्न विजय अण्णा बोराडे यांनी रविवार (दि.१०) रोजी केले.

परभणी येथे कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या चरित्रग्रंथ प्रकाशन व कार्यगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि.पुरुषोत्तम खेडेकर हे उपस्थित होते.यावेळी सत्कारमूर्ती कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर, गंगाबाई देशमुख, प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, मनपा आयुक्त संजय काटकर, माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, प्रसिद्ध कवि इंद्रजित भालेराव, इतिहासकार गंगाधर बनबरे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, कुलगुरू इंद्र मणी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना विजय अण्णा बोराडे म्हणाले की, समाज विकासाचे कार्य करीत असताना प्रश्न किंवा वाद निर्माण न होता, भांडण तंटे अतिशय संयमाने सोडवून काम पूर्ण कसे करावे याचा आदर्शपाठ म्हणजे कांतराव काका आहेत असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा.इंद्रजित भालेराव म्हणाले की, काम करायचं पण काही बोलायचं नाही असं स्थितप्रज्ञ व्यक्तीमत्व म्हणजे काका होय. ‘कांतायण’ हा गौरवग्रंथ उत्कट आणि वाचनीय झालेला असून खऱ्या अर्थाने ही एक सामाजिक कार्यगाथाच आहे. हा ग्रंथ पुरुषोत्तम खेडेकर यांच्या दृष्टिकोनातून निर्माण झाला असून याचे लेखन व संपादन उत्कृष्ट झाले असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यात मदन पाटील लिखित व गंगाधर बनबरे संपादित ‘कांतायण-कांतराव काका देशमुखांची कार्यगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन व कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सुभाष ढगे, प्रा.डॉ.जयंत बोबडे लिखित आणि आर्यन पाटोळे दिग्दर्शित ‘समाजोन्नतीचे ध्यासपर्व’ या चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने कांतराव देशमुख यांना शाल, हार, बैलगाडीची प्रतिकृती देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

अध्यक्षीय समारोप करताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की,शिवराय फुले, शाहू ,सयाजीराव महाराज,डॉ. आंबेडकर आदी महामानवाने केलेले कार्य कांतराव देशमुख पुढे नेत आहेत. आधुनिक काळातील हे फुले आणि सावित्री म्हणजे काका आणि गंगाबाई आहेत.त्यांनी पूर्णांगिनी होऊन कांतराव यांना साथ दिली. यातूनच काकांच्या कार्याची चळवळ निर्माण झाली असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना कांतराव काका देशमुख म्हणाले, गोरगरीब मुलांना संधी मिळाली तर नक्कीच पुढे येतील. या उद्देशाने सुरू केलेले आपण सर्व सोबत राहून कार्य करू असेही ते म्हणाले.

गावातील अंत्यविधीच्या वेळी होणारी हेळसांड आणि नागरिकांची अडचण लक्षात घेता एक गाव एक स्वच्छ व सुंदर स्मशानभूमी निर्माण केली आज ही चळवळ निर्माण झाली असून जिल्ह्यात ९० ठिकाणी हे काम चालू असल्याचे आहे. परभणी येथे मुलींच्या वसतिगृहाची मी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी मधुकर राजे आर्दड, संजय काटकर, गणेश देशमुख, अरुण डोंगरे, डॉ.इंद्र मणी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विठ्ठल भुसारे, सूत्रसंचालन डॉ.दिलीप शृंगारपुतळे, तर आभार प्रा.सुभाष ढगे यांनी मानले.
कार्यक्रमास जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्हा बाहेरून विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .


१. कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या चरित्रग्रंथ आणि कार्यगौरव सोहळ्यात ‘कांतायण’ पुस्तकाचे विमोचन करताना पुरुषोत्तम खेडेकर, विजय अण्णा बोराडे, कांतराव काका देशमुख झरीकर, गंगाबाई देशमुख, मधुकर राजे आर्दड, संजय काटकर, अरुण डोंगरे, इंद्रजित भालेराव, गंगाधर बनबरे, गणेश देशमुख, कुलगुरू डॉ.इंद्र मणी, तृप्ती सांडभोर आदी.

2.कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या चरित्रग्रंथ आणि कार्यगौरव सोहळ्यात कांतराव काका देशमुख झरीकर आणि गंगाबाई देशमुख यांचा कार्यगौरव करताना पुरुषोत्तम खेडेकर, विजय अण्णा बोराडे, मधुकर राजे आर्दड, संजय काटकर, अरुण डोंगरे, इंद्रजित भालेराव, गंगाधर बनबरे, गणेश देशमुख, कुलगुरू डॉ.इंद्र मणी, तृप्ती सांडभोर आदी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button