पुरुषांना घरी बोलावुन त्यांना निवस्त्र करुन त्यांचा व्हिडीओ बनवुन तो व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी वसुल करणारी टोळी गजाआड
नांदेड जिल्हयात घडलेले खंडणी सारखे गुन्हे उघडकीस आणने कामी मा. पोलीस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.
स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री दत्तात्रय काळे यांची टिम तयार करुन नांदेड जिल्हयातील खंडनी सारखे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोउपनि श्री दतात्रय काळे व टिम आरोपीतांचा शोध घेत असतांना त्यांना पो.स्टे. भाग्यनगर गुरनं. ९८/२४ कलम ३८४,३८५,३८६,३२३,५०६,३४ भादंवि गुन्हयातील आरोपी हे पुणे येथे पळून जाण्याचे तयारीत आहेत अशी माहिती मिळालेवरुन त्यांना शिताफीने आरोपीतानां ताब्यात घेतले व त्यांचे कडे कसुन चौकशी केली असता. त्यांची नावे १. विशाल पि. हरिश कोटीयन, वय ३३ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कलामंदीर शिवशक्तीनगर नांदेड २. नितीन पि. दिनेश गायकवाड, यय- २८ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. साठेचौक नांदेड, ३. सुनिल पि. ग्यानोबा वाघमारे, यय- ३४ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. पोर्णीमानगर नांदेड ४. निता भ्र. नितीन जोशी, वय २७ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. प्रकाशनगर नांदेड ५. राधिका भ्र. रुपेश साखरे, वय २५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. गणेशनगर नांदेड असे असुन, त्यांनी प्रकाश नगर कॉनल रोड येथे किरायचे रुम घेतले असुन सदरचे रुममध्ये महिलांच्या मदतीने पुरुषांना बालाचून त्यांना बळजबरीने निवस्त्र करुन, त्यांचा व्हिडीओ बनवुन, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन पुरुषांना वारंवार मोठ्या रक्कमेची मागणी करीत असत.
नांदेड जिल्हयात अशा प्रकारच्या घटना कोणा सोबत घडल्या असतील, अथवा अशा प्रकारची पैशाची मागणी कोणी करीत असेल तर त्यांनी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे तक्रार दयावी. सदरचे गुन्हयातील आरोपी हे पुढील तपास कामी पो.स्टे. भाग्यनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि श्री दतात्रय काळे, पोलीस अमलदार बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, धम्मानंद जाधव, रंनधिरसिंह राजवन्शी, गजानन बयनवाड, ज्वालासिंह बावरी, महीला अमलदार हेमलता भोयर, किरण बाबर, महजबीन शेख, चालक हनुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.