हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र
नांदेड दि २१ मार्च रोजी सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी सकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे अनेक नागरिकांनी या भूकंपाच्या धक्क्यामुळे 1993 च्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिक एकमेकांना समाज माध्यमाद्वारे सांगत असल्याचे दिसून येत आहे या भूकंपाविषयीची सविस्तर माहिती समाज माध्यमाद्वारे श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे