पवित्र रमजान महिन्यात तरी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी.
किनवट (अकरम चव्हाण): किनवट शहरात मागील सात आठ दिवसांपासून शिवाजीनगर,अयप्पानगर, मोमिनपुरा, साठेनगर सह इतर भागात विज पुरवठा रात्री वे रात्री कधीही वारंवार दोन ते चार तास खंडित होत असल्याने नागरीकांना नाहक त्रास होत असल्या बाबतचे निवेदन सहाय्यक अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालय किनवट येथे सामाजिक कार्यकर्ते तथा वकील मिनहाज बडगुजर, माज बडगुजर,अकबर खान आणि इतर मुस्लिम युवकांनी दिले आहे.
किनवट शहरात शिवाजीनगर, अयप्पानगर, मोमिनपुरा,साठेनगर सह ईतर काही भागात विजपुरवठा मागील सात ते आठ दिवसापासून वारंवार खंडीत होत आहे. पवित्र रमजान महीना सुरू असून मुस्लीम बांधव उपासाने राहत आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय टाळणे गरजेचे आहे. सदरील विषय गंभीर स्वरूपाचा असून त्यावर तात्काळ लक्ष्य देऊन वरील विषयी मार्ग लावून नागरिकांची होणारी गैरसोय सोडवावी.सदरील प्रकरणी आपण कसलीही दखल न घेतल्यास आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येण्याचा इशारा निवेदनात नमूद केलेला आहे.ये वेळी निसार भाटी,इरफान बडगुजर,वसीम इंजिनिअर, वहाब कुरैशी, शारुख कुरैशी, मो. वखार, मो. साहिल आदी उपस्थित होते.