पारदर्शक चौकशीस टाळाटाळ करणार्या कार्यकारी अभियंता भोकर यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी.!
किनवट(शहर प्रतिनिधी) : पारदर्शक चौकशीस टाळाटाळ केली जात असल्याने नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक 27/04/2024 रोजी पासून मा.विभागीय आयुक्त साहेब,विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांचे कार्यालय समोर आमरण उपोषणाला सुरुवात करत असल्या बाबतचे निवेदन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम,जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी दिले आहे.जिल्हा परिषदेचा अखत्यारीत असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग (उत्तर) भोकर अंतर्गत किनवट या आदिवासी तालुक्यातील जीप बांधकाम उपविभाग किनवट अंतर्गत शनिवार पेठ ते दरसांगवी या ग्रामीण मार्गावर आज पर्यंत कोणत्याही योजनेत काम करण्यात आले नव्हते म्हणून त्यावर आदिवासी उपयोजना अंतर्गत सन 2022-23 मधे काम मंजूर करण्यात आले होते.सदरील कामासाठी शासनाने 2 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
परंतु सदरील काम शाखा अभियंता श्रीराम पाटील आणि गुत्तेदार श्रीराम कन्स्ट्रक्शन यांनी संगनमताने काम न करताच पैसे उचल करत अपहार केलेला आहे.जी की शासनाची आणि जनतेची पुर्णत फसवणूक करण्यात आलेली आहे. तक्रारी अनुषंगाने मा.रायभोगे साहेब,प्रभारी कार्यकारी अभियंता भोकर यांनी परस्पर सदरील कामास भेट देऊन पाहणी केली आहे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी व्यक्तिशः त्यांना भेटून सर्व वस्तुस्थिती दाखवत सदरील प्रकरणी पारदर्शक चौकशी त्यांचा समक्ष करण्याची विनंती केली होती.त्यांचे दिनांक 11 मार्च 24 रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण होते; परंतु मा. रायभोगे साहेबांशी प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा त्यांनी तीन(3) दिवसांत चौकशी पूर्ण करून कारवाई करतो असे म्हणत त्यांना उपोषण करण्या पासून परावृत्त केले होते.परंतु सदरील प्रकरणी कार्यकारी अभियंता यांनी आज पर्यंत कोणतीही दखल घेतली नाही आहे.
सदरील प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी व्यक्तिशः लक्ष्य देत सदरील कामाची चौकशी त्यांचा मार्गदर्शन खाली तक्रारदार समक्ष करत शासनाची आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या शाखा अभियंता श्रीराम पाटील आणि गुत्तेदार यांचा वर तात्काळ योग्य ती निलंबनाची आणि फोजदारी स्वरूपाची कार्यवाही करत शासनाचा झालेल्या नुकसानाची भरपाई यांचा स्थावर व जंगम मालमत्तेची जप्ती करत करावी, आणि चौकशीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या व 2 कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या कार्यकारी अभियंता रायभोगे साहेब यांचा वर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करावी आणि जो पर्यंत तक्रारदार समक्ष पारदर्शक चौकशी होणारं नाही तो पर्यंत सदरील कामाची कोणतीही देयके अदा करण्यात येवू नयेत आणि सदरील प्रकरणी आपण कसलीही दखल घेत नसल्याने नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक 27/03/2024 पासून मा.विभागीय आयुक्त साहेब, विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांचे कार्यालय समोर आमरण उपोषणाला सुरुवात करत असल्या बाबत निवेदनात नमूद केलेले आहे.
याचा प्रतिलिपी योग्य त्या कार्यवाहीस्तव1) मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 2) मा.विभागीय आयुक्त साहेब, विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).3) मा.वेदमुथा साहेब, उपआयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).4) मा.जिल्हाधिकारी साहेब,कार्यालय नांदेड.5) मा.प्रकल्प अधिकारी साहेब,
ए.आ.वि.प्रकल्प कार्यालय किनवट.6) मा.कार्यकारी अभियंता साहेब, जिल्हा परिषद बांधकाम विभाग(उत्तर) भोकर.7) मा.उप अभियंता साहेब, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग किनवट.8) मा.पोलीस अधीक्षक साहेब,पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) साठी देण्यात आलेल्या आहेत.