क्राईम

नांदेड पोलीसांकडुन अवैद्य, धारधार व घातक शस्त्रसाठा जप्त

मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, यांनी आगामी लोकसभा निवडुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्हातील अवैद्य शस्त्राचा साठा विक्री करणारे लोकांविरुध्द कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

दिनांक 18.03.2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मा. श्री सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक श्री परमेश्वर कदम, सपोनी आर.डी. वटाणे, सोबत पोलीस अंमलदार पोहेकॉ/2085 विजयकुमार नंदे, पोहेकॉ/152 मनोज परदेशी, पोना/1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/3088 बालाजी कदम, पोकॉ/329 मेघराज पुरी, पोकॉ/2896 शेख इम्राण, पोकॉ/14 भाऊसाहेब राठोड, पोकॉ/3113 अंकुश पवार, महीला पोकॉ/3349 शुभांगी कोरेगावे, पोकॉ/2973 अर्चना लांडगे तसेच डीवीजन डी. बी. मधील पोलीस अंमलदार, पोकॉ/3376 चंद्रकांत स्वामी, पोकॉ/1019 श्रीराम दासरे, यांनी पोलीस ठाणे वजिराबाद हद्यीतील गुरुद्वारा गेट नंबर 01 व नगीनाघाट परीसर मधे असलेल्या एकुण तिन दुकानावर छापे मारले.

सदर छापा कारवाई मध्ये धारदर व घातक स्वरुपाचे 49 तलवारी, 94 खंजर, 07 गुप्ती व 02 बिचवा असा एकुण 1,23,400/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयातील एक आरोपीस अटक करण्यात आले आहे. सरद प्रकरणी सरकारतर्फे सपोनि आर.डी. वटाणे, व पोहेकॉ/2085 विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुरन 135/2024 कलम 4/25,7/25 शस्त्र अधिनियम, गुरन 136/2024 कलम 4/25,7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button