जल जीवन मिशन अभियानामुळे यंदा टंचाई कमी भासणार
नांदेड,20 – जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे दरवर्षी जाणवणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा यावर्षी कमी प्रमाणात जाणवतील.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी नांदेड जिल्हा परिषदेचा कार्यभार हाती घेतल्या पासुन वेळोवेळी अधिकारी, अभियंते, कंत्राटदार, वैपकॉस कंपनी, नॅपकॉन कंपनी, टाटा कंसल्टंसी यांच्या सातत्याने आढावा बैठका घेवून, जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनांच्या कामांना गती दिली. त्यामुळे अनेक योजना कार्यान्वित झाल्या. गतवर्षी 4 गावे व 7 वाडी तांड्यांना 6 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. तसेच जिल्हयातील ग्रामीण भागात एकूण 326 खाजगी विहीरी व विंधन विहारी अधिग्रहण करण्यात आलेल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी या योजनेमुळ जिल्हयात अद्याप पर्यंत एकही पाणी टँकर लागलेला नाही. तसेच अधिगृहन केवळ 3 गावांना चालू आहे.
सन 2023 च्या टंचाई आराखड्यात प्रस्तावित 1 हजार 185 विंधन विहिरी पैकी 727 विंधन विहीरींना मंजूरी मिळाली होती. त्यापैकी 522 पूर्ण करण्यात आल्या होत्या. चालू सन 2024 च्या टंचाई आराखड्यात निकषपात्र केवळ 558 इतक्या विंधन विहीरी पात्र आहेत. एकूणच यावर्षी जलजीवन मिशनच्या योजनांच्या कामांमुळे, टँकर, विंधन विहीरी, अधिग्रहन यांची संख्या कमी असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांच्या प्रयत्नाने तसेच तालुका स्तरीय गट विकास अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी या सर्वांच्या अथक प्रयत्नाने, नांदेड जिल्हयाची टँकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू आहे.