नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झाली सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले
नांदेड| कोरोना काळापासून बंद पडलेल्या विमान सेवाला नांदेडमधून अखेर सुरुवात झाली आहे. स्टार एअर कंपनीने नागपूर-नांदेड-पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर नांदेड-पुणे विमानाची सुरुवात झाली आहे. पाहिलं विमान दिनांक २७ जून रोजी पुण्याच्या दिशेनं उड्डाण घेतली असून, ८० आसन क्षमतेच्या विमानात नांदेडहून पहिल्याच दिवशी ५२ प्रवाशांनी नांदेडहून पुण्यासाठी 40 मिनिटांचा प्रवास केला आहे.
नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा प्रसिध्द असल्यामुळे पंजाब, अमृतसरसह अन्य राज्यातुन शिख समाज बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी नांदेडात येत असतात. नांदेड येथून विमानसेवा पूर्ववत सुरु झाल्यामुळे गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना आता कमी वेळात नांदेड शहर गाठता येणार आहे. स्टार एअर इंडिया या विमान कंपनीने नागपूर -नांदेड- पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर दिनांक २७ जून रोजी प्रवाशांना घेऊन नांदेड- पुणे असे विमानाने उड्डाण केले आहे. सकाळी ९.४५ वाजता नागपूरहून स्टार एअर कंपनीचे विमान नांदेडच्या श्रीगुरुगोविंदसिंघजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता विमानाने पुण्याकडे उड्डाण घेतले. पुण्यासह नांदेडहून नागपूर विमानसेवेचा अनेक प्रवाश्यानी लाभ घेतला.
स्टार एअर कंपनीने नागपूर- नांदेड- पुणे अशी विमानसेवा २७ जूनपासून सुरू केली आहे. ८० आसन क्षमता असलेले विमान आज नागपूरहून सकाळी ९.४५ वाजता नांदेड विमानतळावर उतरले. त्यानंतर काही वेळातच विमानाने पुण्याकडे उड्डाण घेतले. या पहिल्या विमान प्रवासात ५२ प्रवासी पुण्यासाठी रवाना झाले त्यांनी अवघ्या ४० मिनीटात पुण गाठल आहे. या विमानाने परत दुपारी १ वाजताच्या सुमारास पुणे येथून परत नांदेड आणि नांदेडहून १.१५ वाजता नागपूरकडे उड्डाण घेतले. यासाठी भाडे कपात होऊन नांदेड- पुणे २ हजार ८०० रुपये भाडे आकारण्यात आले होते. पहिल्याच दिवशी नांदेडकरांनी पुणे विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.