मराठवाडा

नांदेडहून अखेर स्टार एअरची सहा शहराला विमानसेवा सुरू

 

नांदेड- नांदेडहून अखेर अनेक दिवसानंतर पुन्हा विमानसेवेला सुरुवात झाली आहे. देशातील एकूण सहा शहराशी, नांदेड विमान सेवेने जोडले गेले आहे. आदमपूर (जालंदर), हिंडन (नवी दिल्ली) श्री हजूर साहिब नांदेड- बेंगलोर आणि याच मार्गाने परत तसेच हैद्राबाद ते नांदेड व पुढे अहमदाबाद, भुज आणि याच मार्गाने परत अशी विमानसेवा सुरु झाली आहे.

हिडन दिल्लीमार्गे आलेले 75 आसन क्षमतेचे विमान नांदेड विमानतळावर उतरताच प्रवाशांचे व पायलटचे गुरु‌द्वारा बोर्डाच्या वतीने स्वागत करण्यात आले. हे विमान रात्री सातच्या सुमारास बेंगलोरसाठी रवाना झाले. सोबतच रविवारी सकाळी हैदराबादहून नांदेड आणि पुढे नांदेडहून अहमदाबाद अशी विमानसेवाही सुरू झाली आहे. त्यानंतर हेच विमान परतीच्या प्रवासात अहमदाबादहून पुन्हा नांदेडमार्गे हैदराबादला रवाना झाले. येथील गुरु‌द्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब नादेडचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग यांनी रविवार दि. 31 मार्च रोजी संध्याकाळी श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावर आलेल्या पहिल्या स्टार एअर फ्लाईटच्या प्रवाशांचे स्वागत केले.

स्टार एजरचे पहिले विमान आदमपूर जालंदरहून, हिंडन दिल्ली मार्गे सायंकाळी श्री हजूर साहिब नांदेड येथे आले. यामध्ये डॉ. विजय सतबीरसिंग, जसवंतसिंग बॉबी यांच्यासह भाविक आणि इतर प्रवासी आले. या उड्‌डाणाचा मार्ग आदमपूर जालंदर. हिंडन दिल्ली- श्री हजूर साहिब नांदेड- बंगलौर असा आहे. श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावर संत बाबा बलविंदरसिंग कारसेवावाले, स्टार एअरचे मुख्य अधिकारी सिमरनसिंग तिवाना, बुपाना, जस संधू, संदीप, इंदरपाल सिंग शिलेदार, गुरु‌द्वारा बोडांचे प्र. अधीक्षक राजिंदर सिंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

विमानतळावर प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बैंड पार्टीच्या सुरांनी त्यांचे स्वागत झाले. वाटेत गुरु‌द्वारा मालटेकडी साहिब येथे अजितसिंग रामगदिया, बजाज शोरुमसमोर दर्शनसिंग सिद्ध, गुरु गोविंदसिंग एन.आर.आय. निवास, यात्री निवास वळणावर सिंधी समाज, नांदेड व्यापारी संघ आणि गुरु‌द्वारा गेट क्रमांक 2 वैधील सचखंड पब्लिक स्कूल, आय.टी.आय. गुरु‌द्वारा बोर्डाचे कर्मचारी व अधिकान्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले, येथे आलेल्या प्रवाशी भाविकांना अल्पोपहार देण्यात आला. रविवारी दिवसभर विमानसेवा सुरु झाल्याने विमानतळ परिसरामध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत होती

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button