क्राईम
जमिनीच्या कागदपत्रात खाडाखोड करून फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला ठोठावली शिक्षा व दंड…
फिर्यादी यशवंत देविदासराव भोरे, वय 48 वर्षे, यांनी दिनांक 14.06.2004 रोजी पोस्टे वजिराबाद येथे फिर्याद दिली की, फिर्यादीचा व साक्षीदार यांचे भुखंड व तहसीली कार्यालय नांदेड येथील रेकॉर्ड रूमच्या ठिकाणी दिनांक 27.05.2003 चे पुर्वी पासुन ते दिनांक 14.06.2004 या कालावधीत कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना तालुका भुमीअभिलेख कर्यालय, नांदेड येथील अभिलेखात खाडाखोड करून यातील फिर्यादीचे वडीलोपार्जित भुमापन क्रमांक 2675 हा भुखंड कब्जात असतांना सिटी सर्वेच्या मुळ अभिलेखावर अस्तित्वात नसलेला नगर भुखंड क्रमांक 2671 च्या नावाने खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करून सर्वे नं. 11/2 असा भाग दाखवून अस्तित्वात नसलेल्या भुखंडाची खोटी दुसरी प्रत सनद तयार करून सिटी सर्वेच्या मुळ अभिलेखा मध्ये अस्तीत्वात नसताना आरोपीतांनी खोटे व बनावट कागदपत्र तयार करून खोटी व बनावट सनद तयार केली व तीचा वापर उच्च न्यायालय, तालुका दंडाधिकारी कार्यालयात केला. खोटे कागदपत्र खरे आहेत म्हणुन त्याचा वापर केला. वगैरे फिर्याद वरून पोस्टे वजिराबाद गुरनं 128/2004 कलम 420, 468, 465, 471, 201, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयातील आरोपी 1) परशुराम नारायण झळके, वय 44 वर्षे, व्यवसाय तालुका निरीक्षक भुमी अभिलेख नांदेड सध्या रा. भावसार चौक नांदेड 2) अमरसिंग शेरसींग कामठेकर, वय 46 वर्षे, व्यवसाय परिक्षण भुमापक तालुका निरीक्षक भुमी अभिलेख कार्यालय नांदेड ह. मु. रा. टाऊन मार्केट विद्युत भवन नांदेड 3) महमद नवाजखान महमद महेबुबखान, वय 48 वर्षे, व्यवसाय परिक्षण भुमापक तालुका निरीक्षक भुमी अभिलेख कार्यालय नांदेड ह.मु. लेबर कॉलनी नांदेड 4) बक्षीसींग सहेलसिंग रामगडीया, वय 65 वर्षे, व्यवसाय खाजगी रा. तारासिंग मार्केट नांदेड यांचे विरूध्द गुन्हयाचा प्राथमिक तपास करून आरोपी क्र. 1 ते 4 यांचे विरूध्द पोउपनि श्री दिलीप बुरकुल, पोउपनि श्री विश्वांभर हरी सुर्यवशी, पोउपनि श्री सुर्यवंशी यांनी मा. न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
एकुण 19 साक्षीदार तपासले गेले. मा. मुख्य न्यायाधिश श्रीमती किर्ती पी. जैन देसरडा यांनी आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना पाच वर्षे साधी कैद, व साडे सात हजार रूपये दंड ठोठावला. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्रीमती एस. डी. जोहीरे यांनी व पैरवी अधिकारी म्हणुन पोहकों बालाजी लामतुरे यांनी कामकाज पाहिले.