किनवट पो.स्टे. हद्दीतील सायबर सेल पोलीस स्टेशन नांदेड यांचे सहाय्याने एकुण 11 मोबाईल शोध घेवुन तक्रारदार यांना परत देण्यात आले.
पोलीस स्टेशन किनवट हद्दीतील सार्वजनिक ठिकाणातुन आठवडी बाजारातुन महागडे मोबाईल गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी मा. अप्पर पोलीस अधिक्षक भोकर यांनी आदेशित केले होते. त्यानुसर पो.स्टे किनवट चे पथक करुन सायबर सेलच्यामदतीने मिसिंग मोबाईलची शोध घेण्याची मोहिम राबविण्यात आली होती.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणेसाहेब, पो. नि. बिर्ला साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन किनवट पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.काँ. 1913 राठोड, नापोकाँ 1954 संग्राम व पो.काँ. 2924 पठाण यांच्या व सायबर सेलच्या मदतीने गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जावुन एकुण 11 मोबाईल किंमती अंदाजे 2,15,000/- रु चा माल हस्तगत केले आहे. सदरील मोबाईल आज रोजी पो.स्टे. किनवट येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणेसाहेब, पो.नि. बिर्ला साहेब यांचे हस्ते सदरील मोबाईल फिर्यादीकडे परत करण्यात आले आहे.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणेसाहेब, पो.नि बिर्ला साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन किनवट पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.काँ. 1913 राठोड, नापोकों 1954 संग्राम व पो.कॉ. 2924 पठाण यांची सदरची गहाळ मोबाईल शोध मोहीम राबवुन पार पाडली आहे.