मनोरंजन

“बॉलिवडूचा फिल्मफेअर सोहळाही गुजरातला पळवला”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “मुंबईची आर्थिक नाडी…”

बॉलिवूड विश्वातील सर्वांत मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गिफ्ट सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २८ जानेवारीला गुजरात टुरिजमच्या सहाय्याने गुजरात येथे होणार आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित केला जायचा. मात्र, आता गुजरातमध्ये आयोजित करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.

“मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा!” , असं जयंत पाटील म्हणाले. “दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोत्रावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल?”, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली आहे.

१५ जानेवारी रोजी जियो वर्ल्ड सेंटर येथे फिल्मफेअरकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली. यंदाचा ६९ वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी रोजी रंगणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा होणार आहे. २०२० चा अपवाद वगळता फिल्मफेअर सोहळा दरवर्षी मुंबईत आयोजित केला जातो. मात्र, यंदा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते आता सरकारला धारेवर धरत आहेत. अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असताना फिल्मफेअर पुरस्कार सोहळाही गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

डायमंड बोर्सनंतर पुरस्कार सोहळाही गुजरातला

जगातील सर्वांत मोठं कार्यालय सूरत डायमंड बोर्सचे गेल्या महिन्यात १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. डायमंड कंपनीचा सर्वाधिक व्यवसाय मुंबईतून व्हायचा. मात्र, मुंबईतील अनेक डायमंड व्यापारी आता गुजरातला गेल्याने राज्यातील विरोधकांनी याप्रकरणीही सरकारवर तोफ डागली होती. त्याआधीही, महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने आदित्य ठाकरेंसह अनेकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. आता फिल्मफेअर पुरस्कारही गुजरातला गेल्याने विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात बॉलिवूडचं खूप मोठं योगदान असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा गुजरातला गेल्याने मुंबईकरांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button