क्राईम

ड्रायव्हरशी सूत जुळलं, बिल्डर नवऱ्याचा काटा काढला, नवी मुंबईतील विवाहितेचं धक्कादायक कृत्य

नवी मुंबई : नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची हत्या त्याची पत्नी आणि वाहन चालक यांनीच केल्याचे समोर आले आहे. सीवूड्स सेक्टर ४४ मधील अमन बिल्डर्स या कार्यालयात बांधकाम व्यावसायिक मनोज सिंग यांची डोक्यात लोखंडी सळई घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चोवीस तासांच्या आत तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मृत मनोज सिंगकडे काम करणारा वाहन चालक आणि सिंगच्या पत्नीनेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. वाहन चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या पत्नीलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे डीसीपी झोन वनचे विवेक पानसरे यांनी सांगितले आहे.

सीवूड सेक्टर-४४ मधील मनोजकुमार सिंग (३९) या बांधकाम व्यवसायिकाची हत्या त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केल्याचे उघडकीस आले आहे. राजु उर्फ शमशुद्दीन आझम खान अबु कुरेरा (२२) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास राजुने मनोजकुमार सिंग याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि बांधकाम व्यवसायिकाची पत्नी यांच्यात प्रेम सबंध असल्यामुळे ही हत्या झाली आहे, की दुसरं काही कारण आहे, याचा तपास सुरु आहे, मात्र त्याने ही हत्या कशामुळे केली? हे अद्याप स्पष्ट न झाल्याने पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

मनोज सिंग याच्या पत्नीचे आणि त्यांचे पटत नव्हते. सिंग यांना काही वर्षांपूर्वी फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली होती. चार महिने ते कारागृहात असताना त्यांची पत्नी व वाहन चालक आणि पडेल ते काम करणारा खान यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. यातूनच मनोज सिंग यांची हत्या करून पूर्ण मालमत्ता आपल्याला मिळेल या विचाराने सिंग यांची पत्नी आणि खान या दोघांनी सिंग यांच्या डोक्यात हत्या करण्याची योजना शिजत होती. शुक्रवारी ही योजना प्रत्यक्षात उतरविण्यात आली. अद्याप सिंग यांच्या पत्नीला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button