देश विदेश

गाडीला रेस करण्याची सवय महागात पडली, सहा वर्षांचा संस्कार स्कुटीसकट भिंतीवर जाऊन आपटला अन्….

सातारा : खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण राऊत यास कोणाचीही गाडी घेऊन, गाडी रेस करण्याची मोठी हौस होती. मात्र, हीच हौस आज या मुलाच्या जीवघेणी पडल्याने, संस्कार राऊत याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की, संस्कार हा अहिरेश्वर विद्यालय अहिरे ( ता. खंडाळा ) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. या मुलाला नेहमी कोणाचीही गाडी घेऊन, गाडी जागेवर उभे करून, रेस करण्याची मोठी हौस होती. असाच त्याने या गावातील एका स्कुटीवर (दुचाकी ) बसून रेस तो करत होता. मात्र, याचवेळी गाडीने अचानक वेग घेतल्याने ही गाडी भरधाव वेगात समोर असणाऱ्या कठड्याला तसेच भिंतीवर जोरात आढळली. या अपघातात संस्कार राऊत हा गंभीर जखमी झाला. यावेळी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, यावेळी या गाडीच्या पाठीमागे आजूबाजूला उभे असणारे लोक हे धावत या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. या अपघातात संस्कार हा गंभीर जखमी झाला. यावेळी या मुलाला खंडाळा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी लोणंद किंवा शिरवळला हलवण्याचे सांगितल्यानंतर लोणंदला एका खासगी दवाखान्यात दाखल करताच संस्कार लक्ष्मण राऊत मयत झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे म्हावशी गावावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. खंडाळा पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद झाली आहे. खंडाळा पोलीस तपास करत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button