मराठवाडा

रत्नागिरी, नांदेड ते परभणीत काही पेट्रोल पंप बंद,अनेक ठिकाणी वाहनधराकांच्या आजही रांगा लागल्याचं चित्र

मुंबई: केंद्र सरकारच्या नव्या हिट अँड रनबाबतच्या धोरणाबद्दल देशभरातील चालक संपावर गेलेले आहेत. ट्रक चालक, टँकर चालक यांच्यासह विविध चालक संघटना संपावर आहेत. पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक देखील संपावर गेल्यानं राज्यातील काही पेट्रोलचा पुरवठा न झाल्यानं पंप बंद आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पेट्रोल साठा संपला आहे. परभणी आणि नांदेडमध्ये देखील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा दिसून आल्या आहेत.

रत्नागिरीत स्थिती काय?

कोकणातही पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा असून रत्नागिरी येथे पेट्रोल-साठा अद्यापही शिल्लक आहे. मात्र, खेड येथे पेट्रोल संपलंय तर दापोली येथे पेट्रोल साठा लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. चिपळूण येथील पेट्रोल पंपावर देखील मोठ्या रांगा आहेत. कोणत्याही क्षणी पेट्रोल संपवू शकते या भीतीने सगळ्याच पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. अनेक ठिकाणी रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवरती मोठ्या रांगा आहेत

नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी देखील वाहनधारकांची पेट्रोल पंपावर गर्दी

नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दुवशी ही पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवस संप पुकारला असल्याच्या बातम्या काल पासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तेव्हा पेट्रोल पंप देखील बंद राहणार आणि पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीपोटी वाहन धारकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर गर्दी केली आहे. सोमवारी रात्री वाहन धारकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी सकाळी देखील शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती होती. वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

परभणी शहरातील दहा पेट्रोल पंपावर लागले नो स्टॉकचे बोर्ड

केंद्र शासनाने अपघात झाल्यानंतर चालकाला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड लावण्याचा कायदा कायदा लागू केला आहे. यामुळे यामुळे ट्रक टँकर चालकांनी या कायद्याच्या विरोधात स्टेअरिंग छोडो आंदोलन केले आहे. चालक संपावर गेले असल्याने परभणी शहरातील पंधरा पेट्रोल पंपापैकी दहा पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. तर पाच ठिकाणी सध्या स्थितीला पेट्रोलची विक्री केली जात आहे. संध्याकाळपर्यंत या ठिकाणचे पेट्रोल देखील संपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेट्रोल मिळेल की नाही या भावनेतून नागरिक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र परभणी शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.

संपावर लवकरच तोडगा निघेल, नागरिकांनी घाबरून जावू नये

पेट्रोल – डिझेल पंपावर आज संपाचा काहीअंशी परिणाम झालेला आहे. तसेच इतर वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मात्र या संदर्भात लवकरच तोडगा निघेल. नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांना आवाहन आहे आवश्यकता असेल तरच इंधनाचा साठा करा. जेणेकरून गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. सरकारचे संबंधित संघटनेशी बोलणे सुरू आहे. नाशिक मध्ये देखील इंधनाचा तुटवडा अद्याप नाही मात्र नागरिकांची गैरसोय थांबविण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पानेवाडीला जावून संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. यातून नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल, असं पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button