देश विदेश
रोलिंग ब्लॉक मुळे 10 डिसेंबर ला अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्सप्रेस आणि 09 डिसेंबर ला उशिरा धावणाऱ्या गाड्या पूर्ववत वेळा पत्रकानुसार धावतील
दिनांक 09 डिसेंबर ला घेण्यात आलेला लाईन ब्लॉक काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे, यामुळे दिनांक 9 डिसेंबर ला उशिरा धावतील असे घोषित केलेल्या खालील चार गाड्या आणि 10 डिसेंबर ला धावणारी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस पूर्ववत वेळा पत्रकानुसार धावतील.
01. दिनांक 10 डिसेंबर रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान पूर्वी अंशतः रद्द करण्यात आलेली
गाडी क्रमांक 17688 धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस, धर्माबाद ते मनमाड अशी
धावेल. हि गाडी 10 डिसेंबर ला धर्माबाद येथून नियोजित वेळेवर सुटेल. 02. दिनांक 09 डिसेंबरला उशिरा धावतील असे घोषित केलेल्या खालील चार गाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. दिनांक 09 डिसेंबर रोजी या गाड्या नियोजित वेळा पत्रका नुसार
दिनांक पूर्ववत धावतील
17661 काचीगुडा-नगरसोल
17617 मुंबई-नांदेड
17232 नगरसोल-नरसापूर
9 डिसेंबर, 2023 नियमित वेळा पत्रका नुसार धावतील 17630 नांदेड – पुणे
03. गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस दिनांक 09 डिसेंबर, 2023 ला औरंगाबाद येथून तिच्या नियोजित वेळे नुसार सुटेल.