जिला

राष्ट्रवादी काँगेस (शरदचंद्रजी पवार गट) च्या जिल्हा चिटणीस पदी पंडित पा. जाधव यांची निवड.

 

धर्माबाद :(अनंतोजी कालीदास) शासकीय विश्रामगृहात नांदेड येथे शहरातील धडाडीचे युवा नेते पत्रकार पंडित आत्माराम पाटील जाधव यांंची (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, सरचिटणीस डि.बी.जाभरुनकर,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब गोरठेकर, गजानन पांपटवार, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावनगावकर, उपाध्यक्षा रेखाताई राहेरे, सुभाषराव गायकवाड,विक्रम देशमुख, तालुकाध्यक्ष हानमंत पा. जगदंबे पिंपळगावकर,वसंत देशमुख,शिवानंद शिप्परकर, सुनिल पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत
नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली.

पंडित पाटील जाधव यांनी गेल्या आठ नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ काम केले पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले मग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात नायगाव विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना असताना डावलल्याने आज त्यानी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणी पदी निवड करण्यात आली यामुळे तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button