नांदेड पुणे आणि पनवेल, नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस मध्ये तात्पुरत्या स्वरुपात डब्बे वाढविण्यात आले आहेत
नांदेड – पुणे एक्स्प्रेस आणि नांदेड -पनवेल एक्स्प्रेस मधील प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने या दोन्ही गाड्यांत दोन डब्बे तात्पुरत्या स्वरुपात वाढविले आहेत, ते पुढील प्रमाणे –
01. गाडी क्रमांक 17630 /17629 नांदेड – पुणे – नांदेड एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत आणि एक द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास ) असे दोन डब्बे दिनांक 3 डिसेंबर ते 01 जानेवारी, 2024 दरम्यान वाढविण्यात आले आहे.
02. गाडी क्रमांक 17614 /17613 नांदेड पनवेल नांदेड एक्स्प्रेस मध्ये एक तृती श्रेणी वातानुकुलीत आणि एक द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) असे दोन डब्बे दिनांक 4 डिसेंबर ते 03 जानेवारी -2024 दरम्यान वाढविण्यात आले आहे.
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड – संबलपुर- नांदेड एक्स्प्रेस मध्ये दोन कोच तात्पुरत्या स्वरुपात वाढविले आहेत ते पुढील प्रमाणे
१. गाडी क्रमांक 20809 / संबलपुर – नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस मध्ये डिसेंबर महिन्यात एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत आणि एक द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) अशे दोन डब्बे तात्पुरत्या स्वरुपात वाढविले आहेत.