आर्य वैश्य समाज उपवधू वरांचे ऋणानुबंध स्नेहसंमेलन उत्साहात
नांदेड- श्री गणेश मित्र मंडळ नांदेड आयोजित आर्य वैश्य समाज उपक्रमांतर्गत ऋणानुबंध उपवधू वर स्नेहसंमेलनास शहरातील ए.के. संभाजी मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी अध्यक्ष बाबुरावजी शक्करवार, संयोजक डॉ. राजेश तगडपल्लेवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आर्य वैश्य समाजातील उपवर उपवधूंचे विवाह जुळविण्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा वेळ आणि खर्च वाचावा तसेच उपवर उपवधूंना आपल्या पसंतीचे जोडीदार मिळावीत म्हणून आर्य वैश्य समाज उपक्रमांतर्गत श्री गणेश मित्र मंडळ नांदेड च्या वतीने उपवधू उपवर स्नेहसंमेलनाचे आयोजन शहरातील ए.के. संभाजी मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले असून शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या स्नेहसंमेलनास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्नेहमिलन कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक आदी राज्यांसह अमेरिका दुबई इंग्लंड आदी देशांतून मोठ्या संख्येने उपवर उपवधू सहभागी झाले आहेत.
उपवर वधूवरांचे विवाह वेळेत जुळावेत तसेच आर्य वैश्य समाजातील समाज बांधवांची या निमित्ताने एकत्रित येऊन आपल्या समाजा च्या सुख, दुःखाविषयी, प्रगती विषयी चर्चा व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाबुरावजी शुक्रवार, एकनाथराव मामडे, डॉ. राजेश दगडपल्लीवार, श्रीराम मेडेवार, अजित जिल्हेवार, सतीश मुक्कावार, अनिल गंजेवार, नंदकुमार महाजन, किरण जवादवार, डॉ.अजय बोजलवर, बालाजी कवटीकवार, आदित्य कोत्तावार, सुरेश पळशीकर, सुनील मोरलवार, अनिल गंजेवार, राहुल बासटवार, सतीश बिडवई, डॉ.पांडुरंग गंजेवार, सदाशिव महाजन, रवी कोटलवार या आर्य वैश्य समाजातील उच्चशिक्षित व्यक्तींनी सन २००० मध्ये श्री गणेश मित्र मंडळाची स्थापना करून आपलेही समाजाप्रती काही देणे आहे या उद्देशाने ऋणानुबंध हा आर्य वैश्य समाजातील उपवर वधूंचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सतत दोन दिवस हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम चालतो. पहिल्या दिवशी मुला मुलींचे स्नेह मिलन आणि दुसऱ्या दिवशी पालकांसोबत मुलामुलींच्या भेटीगाठी आयोजित केल्या जातात. या स्नेह मिलनामध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक, वकील, इंजिनियर, शिक्षक, आर्किटेक्चर अधिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित मुला मुलींचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी आयोजित केलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमांमध्ये ५० ते ६० विवाह जुळले जातात. आजपर्यंत या ऋणानुबंधाच्या माध्यमातून समाजातील उपवर वधुंचे ५०० च्या विवाह जुळले आहेत. त्यामुळे आर्य वैश्य समाजासाठी श्री गणेश मित्र मंडळाचे कार्य हे अतिशय प्रेरणादायी मानले जात असून याची सर्वत्र चर्चा होत आहे. या कार्यक्रमास आर्य वैश्य समाजातील उपवर उपवधू यांच्यासह त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. आज या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.