खुन व जबरी चोरीचे गुन्हयातील अट्टल गुन्हेगार अटक,
पोलीस ठाणे माळाकोळी हद्दीमध्ये लांडगेवाडी शिवारातील आखाडयावर दिनांक 21/11/2023 रोजी रात्री अज्ञात आरोपीने आखाडयावरील वयोवृध्द जोडप्यास मारहाण करुन महीलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागीने जबरीने चोरून नेले होते. सदर प्रकरणात महीलेस गंभीर मारहाण झाल्याने तिचेवर नांदेड येथे उपचार चालू होते. सदर प्रकरणात पोलीस ठाणे माळाकोळी गुरनं. 176/2023 कलम 397,457,336,34 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर महीलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने सदर गुन्हयात कलम 302 भा द वि वाढ करण्यात आली आहे.
वर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांना निष्पन्न करुन तात्काळ अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी स्थागुशाचे दोन पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 03/12/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारा एक आरोपी मौजे कुरुळयावरुन कंधारकडे येत आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने संगमवाडी फाटा ता कंधार येथे पो. स्टे. माळाकोळी येथील पोलीसाचे मदत घेवुन सापळा रचुन आरोपी न नामे सचिन ऊर्फ बोबडया पिता बापुराव भोसले वय 27 वर्ष रा. कुरुळा ता कंधार जि नांदेड ह. मु. ताडपांगरी ता. जि. परभणी यास आज रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्याने व त्याचा भाऊ नामे धनंजय भोसले रा. कुरुळा ता कंधार यांनी मिळुन सदरचा गुन्हा तसेच पोलीस ठाणे लोहा शिवारातील आखाडयावरील जबरी चोरी केली होती असे सांगीतले. सदर प्रकरणी पोलीस ठाणे लोहा गुरन. 143/2023 कलम 394, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपीचे ताब्यातुन पोलीस ठाणे माळाकोळी गुरन. 178/2023 कलम 397, 457, 336, 34 भा द वि गुन्हयातील 600 ग्राम वजनाचे चांदीचे वाळे किंमती 44,000/- रुपयेचे जप्त करण्यात आले आहेत. तसेच पोलीस ठाणे जळकोट जि. लातुर गुरनं. 225/2023 कलम 379 भा द वि गुन्हयातील शाईन होंडा कंपनीची मोटार सायकल किंमती 1,00,000/- रुपयाची जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीकडुन पोलीस ठाणे माळाकोळी, लोहा व जळकोट जि. लातुर असे तिन गुन्हे उघडकीस आले आहेत.
नमुद आरोपी हा 1. पोलीस ठाणे पिंपळदरी जि. परभणी गुरनं. 109/2023 कलम 454,457,380 भादवि, 2. पोलीस ठाणे कळमनुरी जि. हिंगोली गुरनं. 454/2023 कलम 457,380 भा द वि, 3. पोलीस ठाणे करुंदा जि. हिंगोली गुरनं. 223/2023 कलम 380 भा द वि व 4. पोलीस ठाणे बर्दापुर जि. बिड गुरनं. 82/2023 कलम 457,380 भा द वि या गुन्हयात पाहीजे असुन नमुद पोलीस ठाणेस हस्तांतरीत करुन घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन नमुद आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे माळाकोळी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, सपोउपनि/संजय केंद्रे, मारोती तेलंग, पोहेकॉ/ गुंडेराव करले, हाणमंत पोतदार, पोकों/देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, मारोती मोरे, धम्मा जाधव, ज्वालासिंघ बावरी, बजरंग बोडके, चालक गंगाधर घुगे स्थागुशा, नांदेड व सायबर सेलचे राजु सिटीकर, दिपक ओढणे, व्यंकटेश सांगळे, रेश्मा पठाण यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.