नांदेड – इरोड – नांदेड विशेष गाडीला मुदत वाढ
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हजूर साहिब नांदेड ते इरोड (तामिळनाडू) दरम्यान विशेष गाडी ला 28 जानेवारी, 2024 पर्यन्त मुदत वाढ देण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे :–
1. गाडी क्र. 07189 हजूर साहिब नांदेड ते इरोड विशेष गाडी (साप्ताहिक-शुक्रवारी) : हि गाडी हजूर साहिब नांदेड येथून दर शुक्रवारी दुपारी 14.20 वाजता सुटेल आणि मुदखेड, निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा, काटपाडी, सालेम मार्गे इरोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.00 वाजता पोहोचेल. हि गाडी नांदेड येथून दिनांक 01 डिसेंबर, 2023 ते 26 जानेवारी, 2024 दरम्यान दर शुक्रवारी सुटेल.
2. गाडी क्र. 07190 इरोड ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडी (साप्ताहिक-रविवारी) : हि गाडी इरोड येथून दर रविवारी सकाळी 05.15 वाजता सुटेल आणि सालेम, काटपाडी, रेणीगुंठा, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, मुदखेड मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.30 वाजता पोहोचेल.
हि गाडी इरोड येथून दिनांक 03 डिसेंबर, 2023 ते 28 जानेवारी, 2024 दरम्यान दर शुक्रवारी सुटेल. या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे 18 डब्बे असतील. या विशेष गाड्या नियोजित वेळापत्रक नुसारच धावतील.