देश विदेश

महाराष्ट्र राज्य हज समिती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास ते पदवीधरांना मुंबईत कामाची संधी

महाराष्ट्र राज्य हज समिती अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, हेल्पलाईनसह संगणक तंत्रज्ञ, लिपिक, हेल्पलाइन ऑपरेटर आणि शिपाई पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरता प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेतून भरली जाणारी ही पदे कंत्राटी पद्धतीने ५-६ महिन्याच्या कालावधीसाठी भरली जाणार असून, या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालू आहे.

Maharashtra State Haj Committee मधील पदभरतीसाठी पदांनुसार पात्रता वेगवेगळी असून, अधिक महितीसाठी उमेदवारणी मूळ जाहिरात वाकहाणे गरजेचे आहे. सदर भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : महाराष्ट्र राज्य हज समिती (Maharashtra State Haj Committee)

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदे : १६ जागा

पदनिहाय जागांचा तपशील :
डेटा एंट्री ऑपरेटर : १० जागा
हेल्पलाइनसह संगणक तंत्रज्ञ : १ जागा
लिपिक : २ जागा
हेल्पलाइन ऑपरेटर : १ जागा
शिपाई : २ जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ४ डिसेंबर २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य हज समिती, मोहम्मद हाजी साबू सिद्दीक मुसाफ़िरखाना, खोली क्र. ६,७ व ८, तळ मजला, मुंबई – ४०० ००१
नोकरीचे ठिकाण : मुंबई

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

शिवाय, डेटा एंट्री ऑपरेटर, हेल्पलाइनसह संगणक तंत्रज्ञ, लिपिक, हेल्पलाइन ऑपरेटर पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारला हज विषयक कामकाजाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

महाराष्ट्र राज्य हज समिती मधील भरतीसाठी असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या वरील पत्त्यावर सादर करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ डिसेंबर २०२३ आहे.

 

महत्त्वाचे :
अर्ज साध्य कागदावर असावा.
बायोडेटामध्ये संपूर्ण महितीसह, संपर्क क्रमांक, एक पासपोर्ट आकाराचा फोटो, पात्रता प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड यांची स्वसाक्षंकीत (self attested) झेरॉक्स प्रति सोबत आणणे आवश्यक आहे.
सदर जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारचे वय १८ ते ३८ वर्षे असावे. (विशेष अनुभव अर्हताधारकांना वयोमार्यादेत विशेष शिथिलता देण्यात येईल.)
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ४.१२.२०२३ संध्याकाळी ५ वाजता असून, यानंतर प्राप्त होणार्‍या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button