शिक्षण

आदर्श शिक्षक पुरस्काराने उपेक्षित राहिलेल्या एका ध्येयनिष्ठ शिक्षकाच्या सेवापूर्तीची आदर्शवत सांगता:-

शिक्षक तथा गुरूशिवाय एकलव्याही विद्या प्राप्त झाली नव्हती हे पुरातन काळापासून ऐकतो. अनेक शास्त्रात आई हीच बाळाची पहिली शिक्षिका असल्याचे कथन नमूद केले गेले. आणि हे पूर्णत: वास्तव असल्याची प्रचिती मां जिजाऊ यांनी थोर राजे पुत्रास दिलेल्या महत्तम शिकवणीतून जगाला आलेली आहे. तरीसुद्धा सामाजिक, आर्थिक , व्यावहारिक आणि भौगोलिक तथा ऐतिहासिक क्षेत्रातील ज्ञान हे शिक्षणाने आणि शिक्षकाकडूनच मिळवू शकते हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे सृष्टीत आईवडील जसे पूजनीय असले तरी शिक्षक हे वंदनीय ठरतात. दुर्दैवाने आधुनिक काळात कांहीनी या आदर्श पेशाला कलंकित करण्याचे पापही केलेत त्याची चर्चा या शुभ समयी नको.

मदिना तुल उलूम हायस्कूल , नांदेड ही अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी 1961 ची संस्था आहे. या संस्थेचा पाया पै. माजी मंत्री सय्यद फारूक पाशा यांनी तेव्हाचे केंद्रीय संरक्षण मंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रचल्याचा इतिहास आहे. प्रारंभी या संस्थेच्या विश्वस्तांनी आखलेला धोरणात्मक दूरदर्शीपणा आणि शिक्षकांच्या समर्पित सेवाभावातून या संस्थेतून अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन समाज तथा राष्ट्रसेवेत आलेत. ह्याच संस्थेत आपल्या दायित्व्याशी तत्पर व प्रामाणिकपणे सलग 30 वर्षे ज्ञानार्जनाचे धडे देणारे शिक्षक मो.अब्दुल अलीम हे दि. 30/11/2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षकी पेशात राहिलेल्या वडिलाच्या एकूलत्या मुलाने त्याच क्षेत्रात नोकरीची इच्छा बाळगून गणित व इलेक्ट्रॉनिक विषयात बी एस्सी नंतर बी.एड. पदवी 1987 मध्ये प्रथमक्रमाने प्राप्त केली. त्यानंतर 1992 मध्ये जि.प. उस्मानाबाद ( धाराशीव ) येथे सहशिक्षक पदावर नियुक्त झाले. परंतु वडिलांच्या गंभीर आजारपणामुळे 1994 मध्ये शासकीय संस्थेची नोकरी त्यागून मदिना तुल उलूम या खाजगी संस्थेत रुजू झाले. तेव्हापासून अविरतपणे त्यांनी या संस्थेत लक्षवेधी सेवा दिल्याचे ऐकून आहे. वर्गात शिकवताना चुकूनही क्षणभर खुर्चीवर न बसता स्टॅंडिंग क्लास घेणारे शिक्षक म्हणून विद्यार्थी व सहकारीमध्ये प्रसिद्ध होते.

 

तसेच पूर्ण सेवाकाळात आपल्या शिष्यांकडून एकदाही खडू / छडी मागवण्यासारखा प्रसंग आठवत नसल्याचे कथन चर्चेत केले. आणखी अविश्वसनीय पण पूर्ण सत्य व अचंबित करणारी बाब म्हणजे शाळेत असताना ड्युटी संपेपर्यंत कधीही अन्न पाणी न घेतल्याचे प्रकर्षाने सांगितले. विशेष म्हणजे या गोष्टीचा त्यांच्या प्रकृतीवर कसलाही परिणाम झाला नाही. खाजगी शिकवणी न घेता सदैव संस्थाशी एकनिष्ठ राहणारे , वेळप्रसंगी अतिरिक्त वर्ग घेणारे एक उर्जावान शिक्षक अशी त्यांची ख्याती राहिली. शाळेतील अकॅडमिक या आद्य कर्तव्याशिवाय संस्थेच्या प्रशासनिक व व्यवस्थापन कार्यातही सहभागी होत असल्याचे ऐकण्यात आले. कर्तव्यपरायणता हेच ध्येय व निष्ठा समजून सेवा करणारे शिक्षक मो अब्दुल अलीम ह्यांच्या कार्याची दखल राज्यस्तरीय शिक्षण क्षेत्रात घेतली नसली तरी संस्थेच्या व विद्यार्थ्याच्या मनात त्यांचे नाव कायम कोरले असणार ह्यात शंका नाही.

कुठल्याही समाजाचे व राष्ट्राच्या प्रगतीचे माध्यम केवळ शिक्षणच आहे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुरस्कृत केल्याप्रमाणे व इस्लाम धर्मात ” पढो ” अशी शिकवण दिल्याप्रमाणे त्यांनी आपल्या एकमेव मुलगी व मुलासही उच्चशिक्षित करून करिअरमध्ये स्थिरावले. शहरातील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक असलेल्या या निस्पृह सद्गृहस्थाशी माझे जवळचे नाते जुळले असल्याचा मला अभिमान आहे. त्यांना यशस्वी सेवापूर्ती निमित्त तथा सेवानिवृत्त उप्रान्त सुखी व निरोगी जीवनासाठी

हार्दिक शुभेच्छा .
(अजीज लहानकर इंजिनिअर)

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button