ऑटो चालकाने ऑटोत विसरलेले तिन मोबाईल फोन केले परत
दिनांक 24.11.2023 रोजी रात्री 21.00 वा. सुमारास तिन महिला प्रवासी नामे कोमल जुगलकिशोर तोष्णीवाल, वैष्णवी तोष्णीवाल रा. हैद्राबाद व नेहा ठाकुर रा. सकोजीनगर नांदेड हया गाडीपुरा नांदेड येथुन निघुन ऑटोने सामान बॅगसह रविनगर कौठा येथे आले व ऑटोतुन उतरतांना आपले जवळील पिशवी व त्यात असलेले तिन मोबाईल एकुण अंदाजे किंमती 65,000/-रूपयाचे ऑटोतच विसरले. ऑटो निघून गेल्यानंतर सदर महिलांना आपली पिशवी व त्यात असलेले तिन मोबाईल ऑटोतच विसरून गेल्याचे लक्षात आल्यांनतर त्यांनी दुसरे मोबाईल वरून आपले ऑटोत विसलेले मोबाईलवर कॉल केला असता ऑटो चालक शेख रियाज यांनी फोन उचलुन सदर महिला यांना बोलले व तुमचे विसरलेले तिन मोबाईल फोन मी आमचे ऑटो संघटनेचे कार्यालय, विमानतळ नांदेड येथे जमा केले आहेत ते तुम्ही तेथुन घेवून जा असे कळविले.
दिनांक 25.11.2023 रोजी टायगर ऑटो संघटनचे अध्यक्ष अहमद बाबा यांनी ऑटोत विसलेले तिन मोबाईल फोन, ऑटो चालक शेख रियाज, आपले सहकारी मुखीद पठाण, मुस्तकीम (गुड्डु भाई), मोहमद साबीर, शेख अहमद, शेख रियाज, शेख ऊबेद यांचे सह पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांची भेट घेवून त्यांना सर्व प्रकार सांगितला व महिलांना पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावले व मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे हस्ते सदर महिलांना मोबाईल परत देण्यात आले व ऑटो चालक शेख रियाज यांना एक हजार रूपये बक्षिस देवून सन्मानित केले. तिनही महिलांनी नांदेड पोलीस दलाचे व ऑटो चालक शेख रियाज व टायगर ऑटो संघटना नांदेड यांचे आभार मानले.