क्राईम

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी काही कुख्यात 43 बदमाश, गॅगस्टर, यांची यादी जाहीर

राष्ट्रीय स्तरावर देशात शांतता राखणे गुन्हेगारांची माहिती संकलीत करणे देशविघात कृत्य करणारे, कुख्यात बदमाश, गैंगस्टर यांची माहिती ठेवणे, त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून सदरची माहिती भारत सरकारला देण्याचे काम राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करीत असते..
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी काही कुख्यात 43 बदमाश, गॅगस्टर, यांची यादी नुकतीच जाहीर केली असून सदरचे कुख्यात बदमाश, गॅगस्टर हे फरार आहेत. त्यांचेवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी बक्षीस जाहीर केलेले आहे. सदरचे आरोपी हे भारतातील कोणत्याही राज्यात, शहरात तसेच इतर देशात आश्रय घेण्याची शक्यता असुन नांदेड शहर हे धार्मीक दृष्टया व गुरूगोविंदसिंघ यांची पावनभूमी म्हणुन जगप्रसिध्द असुन देश विदेशातील भावीक यांची नांदेड शहराहरात मोठया प्रमाणात ये जा असते त्यामुळे नांदेड जिल्हयात व शहरात संशयीत व जाहीर केलेले गुन्हेगार है आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील व शहरातील हॉटेल, लॉजेस, ढावे, यात्री निवास, डेरे, सराय, आश्रमशाळा तसेच भाडेकरूंनसाठी खाजगी निवास्थाने पुरविणारे या ठिकाणी आपली ओळख लपवून आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही,
त्याकरीता कुठल्याही अनोळखी व्यक्तीस त्यांची पूर्णतः ओळख पटवून जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, व इतर शासनमान्य ओळखपत्राची चौकशी व शहानिशा तसेच पुर्ण खात्री झाल्यानंतरच त्यांना आश्रय देण्यात यावा. तसेच लॉजेस व हॉटेल चालकांनी त्यांचे राहणेबाबतच्या आवश्यक त्या सर्व नोंदी रजिस्टरला ओळखपत्रासह घेवून अद्यावत ठेवावी व त्याची पुर्ण माहिती सबंधीत पोलीस स्टेशनला द्यावी. तसेच संशयित व्यक्ती अगर वस्तु आपल्या निदर्शनास आल्यास डायल 112, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड येथील 02462-234720 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी जनतेस केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button