हेल्थ
जागतिक फार्मासिस्ट दिन भोकर ग्रामीण रुग्णालय येथे साजरा
भोकर :- आज दिनांक २५ सप्टेंबर ” जागतिक फार्मासिस्ट दिन (औषध निर्माण अधिकारी ) ” निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड येथील औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे व गिरी रावलोड यांचा भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करून साजरा करण्यात आला.
यावेळी आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, अत्रिनंदन पांचाळ, मनोज पांचाळ, कनिष्ठ लिपिक प्रल्हाद होळगे, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, डाटा ऑपरेटर माया आडे आदि कर्मचारी उपस्थित होते.