पूरग्रस्त गावात 24 तास वैद्यकिय सेवा देण्याचे आदेश
नांदेड,4- जिल्हात अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हयातील पूरग्रस्त गावात चोविसतास वैद्यकिय देण्यास सुरवात केली आहे.
अर्धापूर तालुकयातील शैलगाव बु व शैलगाव खु या गावांचा अतिवृष्टीमुळे संपर्क तुटला होता. आज या गावास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. गावातील नाल्यात पाणी तुंबलेल्या गटार वाहत्या करणे. पाण्याची सर्व स्तोत्राचे TCL द्वारे जलसुध्दीकरण करणे, पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविणे, धुर फवारणी करणे आदी संदर्भात आढाव घेवून कामे करण्याच्या सूचना आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगण्वाडी कार्यकतर्भी यांना सांगीतले.
तसेच घरोघरी सर्वेक्षण करून गरोदर माता, बालक, स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्तींना ग्रामपंचायतमध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ओपीडीसाठी आरोग्य तपासणीसाठी घेवून यावे तसेच मेडोकलोरचे घरोघरी वाटप करावे अशा सूचना दिल्या.
या भेटी दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच कुटूंबांनी या काळात काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील एकुण 20 पूरग्रस्त गावांमध्ये चोविस तास वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आरोग्य यंत्रणांना आदेशीत केले आहे. पूरग्रस्त गावात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा दैनिक आढावा जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे.