हेल्थ

” जागतिक मानसिक आरोग्य ” दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

 

भोकर :- आज दि. 10 ऑक्टोबर ” जागतिक मानसिक आरोग्य ” दिन
प्रथम प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यात आली.

तालुका विधी सेवा समिती भोकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/ प्रेरणा प्रकल्प, व ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.आर.एस. इरले सह न्यायाधीश भोकर , प्रमुख पाहुणे मा.डी.डी.माने साहेब न्यायाधीश भोकर, डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, डॉ.शाहू शिराढोणकर, मानसउपचार तज्ञ, डॉ संदेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी भोकर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रास्ताविक व सूत्र संचालन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक यांनी केले.

मानसिक आरोग्य बदल सविस्तर मार्गदर्शन व घ्यावयाची काळजी या बाबत डॉ शाहू शिराढोणकर मानसउपचार तज्ञ यांनी केले. अध्यक्षशीय समारोप मा.आर.एस. इरले सह न्यायाधीश भोकर यांनी केले.
मानसिक रुग्ण यांना औषध उपचार देण्यात आला.
यावेळी न्यायालय भोकर येथील दिलिप मचेवार, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/प्रेरणा प्रकल्प नांदेड येथील अरुण वाघमारे, रुपाली मस्के, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button