क्राईम

करण-अर्जुन मध्ये वाद; लहानग्याचा गळा आवळून मोठ्या भावाने केला खून

मोबाईलच्या देवाण घेवाणीवरुन दोन भावांमध्ये वाद झाला. भांवडांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड शहरालगत असलेल्या गोपाळचावडी येथे रविवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२६) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोठ्या भावाने मोबाईलसाठी लहान भावाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अर्जुन राजू गवळे (वय २०) असं मृताचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहरापासून काही अंतरावर गोपाळचावडी हे छोटे गाव आहे. गावातील रहिवासी अर्जुन राजू गवळे आणि त्याचा मोठा भाऊ करण राजू गवळे या दोन्ही भावंडामध्ये रविवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईलमुळे वाद झाला होता. लहान भाऊ अर्जुनने करणकडे मोबाईल वापरण्याकरिता मागितला. मात्र, करणने मोबाईल देण्यास नकार दिला. या वरून दोघा भावांमध्ये जोरदार भांडण झालं. भांडण विकोपाला गेल्याने दोघांमध्ये हाणामारी देखील झाली. लहान भावाने मारहाण केल्याचा संताप आल्याने करणने २० वर्षीय अर्जुनचा साडीने गळा आवळून खून केला.

दरम्यान, मृत अर्जुनचा मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे यांच्या तक्रारीवरुन सोमवारी ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात तसेच त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलिस उपनिरिक्षक विजय पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

तरुणाईला मोबाईलचे वेड लागले:
सध्या मोबाईलने तरुण पीढीला वेड लावले आहे. मोबाईलच्या दुष्परिणामामुळे कुटूंबातील संवाद हरवल्याच्या चर्चा नित्यनेमाने होत असतांनाही तरुण पीढी मोबाईलमुळे बेजबाबदार पणे वागताना पहायला मिळत आहेत. ऑनलाईन गेमसाठी वाटेल ती तयारी असल्याचे हल्लीच्या काळात पहायला मिळते. अनेकजण मोबाईल हातात नसेल तर सैरभर झाल्याचे पाहायला मिळतात. तरुण पिढीने वेळीच मोबाईलच्या अतिवापरावर पायबंद घालणे गरजेचे बनले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button