जिला

कॉलेजचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा, घरापासून काहीच अंतरावर १६ वर्षीय मुलीसोबत अनर्थ घडला

नांदेड: आकरावीत प्रवेश घेतल्या नंतर आज पहिल्याच दिवशी कॉलेजसाठी घरातून निघालेल्या एका १६ वर्षीय तरुणीवर नियतीने घात केला. ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वडगाव गावा जवळील मोरगाव फाटा येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली. पूजा देवजी चिरपकटलेवार असं या मयत तरुणीचं नाव आहे.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, घटनेनंतर फरार झालेल्या ट्रक चालकाला पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग केला. मात्र, पाठलाग करत असल्याने ट्रक चालकाने रस्त्यावरच ट्रक सोडला आणि तो पसार झाला. दरम्यान, कॉलेजचा पहिलाच दिवस आणि त्यातच दुर्देवी घटनेत तिच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. एका १६ वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले

राष्ट्रीय महामार्गावर वाहनाचा वाढलेला वेग आणि बेसुमार पळवणाऱ्या गाड्या बेशिस्त चालकामुळे अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गाव तिथे गतिरोधक दिल्यास अपघाताच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसेल, असे नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन दिवसेंदिवस राजकीय महामार्गावर होत असलेले वाढते अपघाताला आळा घालण्याचा प्रयत्न करावा, असेही अनेकांच्या तोंडून घटनास्थळावर ऐकण्यास मिळत होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button